Bholaa Shankar First look : दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीचा (Chiranjeevi) 'भोला शंकर' (Bholaa Shankar) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाशिवरात्रीला या सिनेमातील चिरंजीवीच्या लूकची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 


'भोला शंकर' सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. या सिनेमात चिरंजीवी डॅशिंग लूकमध्ये दिसणार आहे. चिरंजीवीचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मेहर रमेशने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात कीर्ती सुरेशसोबत तमन्ना भाटियाही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.





ऑगस्ट 2021 मध्ये या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. हैदराबादमध्ये या सिनेमाचे शूटिंग झाले आहे. चिगंजीवी राम चरणच्या 'आचार्य' सिनेमातदेखील दिसणार आहे. हा सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


Web Series Releasing March : अजय देवगणची ‘रुद्रा’ ते विद्या बालनची ‘जलसा’, मार्च महिन्यात ओटीटीववर मनोरंजनाची धूम!


Gangubai Kathaiwadi : 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाच्या यशात अमूलही सहभागी, शेअर केले व्यंगचित्र


Maha Shivratri 2022: हेमा मालिनी, कंगना रनौत, मौनी रॉयसह 'या' अभिनेत्रींनी दिल्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha