Chhaava Box Office Collection Day 28: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारलेला छावा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रोज कमाईचे नवनवे विक्रम मोडत आहे. अजूनही या चित्रपटाची घोडदौड चालूच आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून आजपर्यंत हा चित्रपट सिनेमागृहात चालू आहे. या सिनेमा कमाईचा 500 कोटींचा आकडे पार केला आहे. प्रदर्शनाच्या 28 व्या दिवशी या सिनेमाला अॅनिमल या चित्रपटाला मागे टाकलं आहे.
आतापर्यंत किती कमाई केली?
छावा चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात 225.28 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 186.18 कोटींची कमाई केली. तर प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 84.94 कोटी रुपये कमवले. चौथ्या आठवड्यात 'छावा' चित्रपटाने 36.59 कोटी रुपये कमवले. प्रदर्शनाच्या 25 व्या दिवशी या चित्रपटाने 6 कोटी रुपये कमवले. तर 26 व्या दिवशी 5.25 कोटी आणि 27 व्या दिवशी 5.05 कोटी रुपयांची कमाई केली होती.
रणबीर कपूरच्या अॅनिमल चित्रपटाला पछाडलं?
छावा चित्रपटाने आतापर्यंत 27 व्या दिशी एकूण 549.81 कोटी रुपये कमवले आहेत. आता याच चित्रपटाच्या 28 व्या दिवसाच्या कमाईचेही आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 28 व्या दिवशी 4.35 कोटी रुपये कमवले आहेत. या कमाईसह छावा चित्रपटाच्या कमाईचा आकडा 554.16 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. या चित्रपटाने आता कमाईच्या बाबतीत 'अॅनिमल' या चित्रपटालादेखील मागंट टाकलं आहे. 2023 साली प्रदर्शित झालेल्या अॅनिमल या चित्रपटाने एकूण 553.87 कोटी रुपयांची कमाई केली होती.
8 वी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला 'छावा'
रणबीर कपूरच्या अॅक्शन थ्रिलर असलेल्या अॅनिमल या चित्रपटाला छावाने मागे टाकून नवा विक्रम रचला आहे. छावा हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा भारतातील 8 वा चित्रपट ठरला आहे. आता हा चित्रपट लवकरच अभिनेता राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या स्त्री-2 या चित्रपटाला मागे टाकण्याची शक्यता आहे. कारण स्त्री-2 या चित्रपटाने एकूण 597.99 कोटी रुपयांची कमाई केलेली आहे. आगामी दिवसाच छावा चित्रपटाीच अशीच घोडदौड चालू राहिली तर तो लवकरच स्त्री-2 या चित्रपटालाही मागे टाकू शकतो.
विकी कौशलचे कोणते चित्रपट येणार?
छावा या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका केलेली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाई यांची भूमिका केली आहे. विकी कौशलचा आगामी काळात 'महावतार' आणि 'लव अँड वॉर' हे चित्रपट येणार आहेत. 'लव अँड वॉर' या चित्रपटात विकी कौशलसोबत रणबीर कपूर, आलिया भट्ट आदी कलाकार दिसणार आहेत.
हेही वाचा :