भरदार साडी, मोकळे केस, युझवेंद्रसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेनंतर धनश्रीचं तुफान होळी सेलिब्रेशन, डान्सही केला!
कोरिओग्राफर आणि डान्सर धनश्री वर्मा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. तिचा पती क्रिकेटर युझवेंद्र चहलसोबत तिचे बिनसले असून लवकरच ते घटस्फोट घेणार आहेत, असं म्हटलं जातंय. दरम्यान, होळीच्या पावन पर्वाला धनश्रीने धुलीवंदन साजरे केले. या सेलिब्रेशनचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधुलीवंदनानिमित्त धनश्री वर्माने खास पूज केली. यावेळी तिने साडी परिधान केली होती. या साडीत तिने देवापुढे बसून फोटोशूट केले.
आणखी एका व्हिडीओत धनश्री वर्मा तिच्या आईसोबत नाचतानादेखील दिसतेय. तिने पोस्ट केलेल्या या फोटोंची आणि व्हिडीओंची सगळीकडे चर्चा होत आहे.
धनश्री वर्माने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर काही व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. या व्हिडीओंमध्ये धनश्री वर्मा जोमात डान्स करताना दिसतेय.
यावेळी धनश्री आणि कक्कर कुटुंबाने फुलांची होळी खेळून धुलीवंदन साजरे केले. धनश्रीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करून 'होळीच्या खूप खूप शुभेच्छा. यावेळी मी माझ्या सर्वाधिक चांगल्या लोकांसोबत कीर्तन केलं. सोबतच फुलांची होळी खेळली,' असं तिने म्हटलंय.
नेहा कक्करने काही फोटो तिचा पती रोहनप्रीत याच्यासोबतही काढले आहेत.
या कार्यक्रमात टोनी कक्कर आणि सोनू कक्करही उपस्थित होते.
यावेळचे धुलीवंदन तिने आपली मैत्रीण नेहा कक्करसोबत होळी साजरी केली. या उत्सवात नेहा कक्करचा पती रोहनप्रीत सिंहदेखील यावेळी उपस्थित होता.
धुलिवंदनाच्या सेलिब्रेशनमध्ये यावेळी नेहा कक्करने गुलाबी रंगाचा सूट परिधान केला होता. सोबतच तिने केसांमध्ये गुलाब माळला होता. या फोटोंमध्ये नेहा कक्कर आणि धनश्री एकत्र दिसत आहेत. त्यांनी एकत्र फोटोशूट केलंय.