एक्स्प्लोर

'ठाकरे' साठी दोन हिंदी चित्रपटांच्या तारखा पुढे ढकलल्या!

याच दिवशी कंगना राणावतचा 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी' आणि 'चिट इंडिया' या दोन चित्रपटांचा समावेश आहे. मात्र ‘ठाकरे’साठी 'चिट इंडिया' चित्रपटाची तारीख पुढे ढकलली असून 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी' या चित्रपटाची तारीख पुढे ढकलली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुंबई : सध्या मराठी चित्रपटाला थिएटर मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागत आहे. सिम्बा आणि भाई यांचा वाद ताजा असताना मराठी मनाला सुखावणारी बाब घडली आहे. येत्या 25 जानेवारीला अभिजीत पानसे दिग्दर्शित 'ठाकरे' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या शौमिक सेन दिग्दर्शित 'चिट इंडिया' चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. आज संध्याकाळी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात ही घोषणा होणार आहे. ही पत्रकार परिषद 'चिट इंडिया'ची असली तरी त्या व्यासपीठावर खासदार व ठाकरे चित्रपटाचे निर्माते संजय राऊत व आदित्य ठाकरे यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात ही अधिकृत घोषणा होईल. मिळालेल्या माहितीनुसार 'ठाकरे' चित्रपटाबाबत असलेली उत्सुकता पाहता बहुचर्चित मणिकर्णिका हा चित्रपटही आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 25  जानेवारीला 'ठाकरे' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. याच दिवशी कंगना राणावतचा 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी' आणि 'चिट इंडिया' या दोन चित्रपटांचा समावेश आहे. मात्र ‘ठाकरे’साठी 'चिट इंडिया'  चित्रपटाची तारीख पुढे ढकलली असून 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी' या चित्रपटाची तारीख पुढे ढकलली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 'ठाकरे' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर शिवसेनेशी संबंधित चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली होती. ‘ठाकरे चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे, या तारखेला अन्य कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही’, अशा आशयाची पोस्ट त्यांनी टाकली आहे. 25 जानेवारीला अन्य चित्रपट प्रदर्शित झाल्यास शिवसेना स्टाइलने उत्तर देऊ , असेही त्यांनी म्हटले होते. मात्र ही शिवसेनेची भूमिका नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. 'ठाकरे' व्यतिरिक्त 25 जानेवारीला दुसरा कोणताही चित्रपट रिलीज होऊ देणार नाही, ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. लोक उत्साहाने, प्रेमाने मत व्यक्त करत आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं होतं. काय म्हणाले होते बाळा लोकरे? 'ठाकरे' सिनेमाचा ट्रेलर लॉन्सनंतर बाळा लोकरे यांची फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. येत्या 25 जानेवारीला 'ठाकरे' सिनेमाव्यतिरिक्त कोणताही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा धमकी वजा इशारा बाळा लोकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिला आहे. त्यानंतर लोकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, 'ठाकरे' सिनेमा 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या दिवशी इतर कोणताही चित्रपट आम्ही चालू देणार नाही. जर कुणी इतर चित्रपट प्रदर्शित करणार असेल तर त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असल्याने बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांची ही इच्छा असल्याने आम्ही यावर ठाम आहोत, असं बाळा लोकरे यांनी सांगितलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Actress Asha Singh Passes Away: 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
Govinda legal Action: दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
Shweta Tiwari MNS Shalini Thackeray: राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
Govinda Spotted Outside Hospital: चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?
चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget