एक्स्प्लोर
Advertisement
'ग्रेट ग्रँड मस्ती'ची सेन्सॉर कॉपी 15 दिवस आधी लीक
मुंबई : 'मस्ती' चित्रपटाचा सिक्वल असलेल्या ग्रेट ग्रँड मस्ती या सिनेमाची सेन्सॉर कॉपी प्रदर्शनापूर्वी लीक झाल्याची धक्कादायक माहिती आहे. रिलीजच्या 15 ते 20 दिवस आधीच हा प्रकार उघडकीस आला आहे.
ग्रेट ग्रँड मस्ती हा चित्रपट 22 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या जवळपास 17 दिवस आधीच त्याची सेन्सॉर कॉपी ऑनलाईन लीक झाली आहे. विशेष म्हणजे उडता पंजाब या चित्रपटाची सेन्सॉर कॉपी लीक झाल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार समोर आला आहे.
टॉरंटवर सिनेमाची कॉपी उपलब्ध झाल्यानंतर अनेकांनी तो डाऊनलोड केला आहे. तर अनेक जणांनी ट्विटरवर हे फोटो शेअर करत संतापही व्यक्त केला आहे.
ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटात मस्ती सिनेमातील त्रिकूट विवेक ऑबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी यांची प्रमुख भूमिका आहे. तर उर्वशी रौतेला, श्रद्धा दास, पूजा चोप्राही यात दिसणार आहे. मस्ती आणि ग्रँड मस्ती नंतर या सीरिजमधील ग्रेट ग्रँड मस्ती हा तिसरा चित्रपट आहे.
उडता पंजाब या चित्रपटाच्यावेळी मुंबई पोलिसांनी कठोर पावलं उचलली होती. ग्रेट ग्रँड मस्तीच्या बाबतीतही पोलिस कारवाई सुरु करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. सैराट चित्रपटाच्या रिलीजनंतरही त्याच्या पायरसीचा प्रकार समोर आला होता.
ग्रेट ग्रँड मस्ती हा चित्रपट प्रदर्शनाच्या कित्येक दिवस आधीच ऑनलाईन लीक झाल्यामुळे चित्रपटाच्या व्यवसायावर मोठा परिणाम होईल असं मानलं जात आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
बातम्या
विश्व
मुंबई
Advertisement