Anant-Radhika Wedding : शिल्पा शेट्टी, सैफ-करीना ते खिलाडी कुमार; अंबनींच्या लग्नसोहळ्याला 'या' कलाकारांची पाठ, नेमकं कारण काय?
Anant-Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याला जगभरातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. पण काही बॉलीवूड कलाकारांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं.
जयदीप मेढेLast Updated: 13 Jul 2024 05:06 PM

पार्श्वभूमी
Anant-Radhika Wedding : मुकेश अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानीने (Anant Ambani) राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) लग्नगाठ बांधली. या सोहळ्याला राजकीय नेत्यांपासून जवळपास संपूर्ण बॉलीवूडने उपस्थिती लावली होती. पण काही...More
Anant-Radhika Wedding : मुकेश अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानीने (Anant Ambani) राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) लग्नगाठ बांधली. या सोहळ्याला राजकीय नेत्यांपासून जवळपास संपूर्ण बॉलीवूडने उपस्थिती लावली होती. पण काही बॉलीवूड कलाकार मात्र सोहळ्यात कुठेच दिसले नाहीत. इतकच नव्हे तर मागील अनेक दिवसांपासून या सोहळ्याची रेलचेल सुरु आहे. त्या सोहळ्यांमध्येही ही मंडळी कुठेच दिसली नाहीत. काही महिन्यांपूर्वी अनंत आणि राधिकाचा प्री वेडिंग सोहळा पार पडला होता. त्यावेळी मात्र हे कलाकार दिसले होते. पण आता लग्नसोहळ्यातून मात्र ही मंडळी गायब दिसली. सलमान खान, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, शाहरुख आणि गौरी यांसारखे अनेक कलाकार उपस्थित होते. विशेष म्हणजे प्रियांका तिच्या नवऱ्यासोबत परदेशातून आली होती. पण मुंबईतल्या या सोहळ्याला मुंबईतल्याच कलाकारांनी हजेरी लावली नाही. कोणते कलाकार होते अनुपस्थितश्रद्धा कपूर, सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बाल, सैफ अली खान, करीना कपूर, काजोल, अक्षय कुमार, कंगना रणौत, विराट कोहली आणि अनुष्का, सनी देओल आणि बॉबी देओल, तब्बू, परिणीती चोप्रा, आमिर खान, शिल्पा शेट्टी, कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर या कलाकारांनी या सोहळ्याला पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. पण हे कलाकार या सोहळ्याला का उपस्थित नव्हते याचं कारण अद्यापही समोर आलेलं नाहीये. पण 14 जुलै रोजी अनंत-राधिकाचा रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. त्यावेळी तरी के कलाकार उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नेमकं कारण काय?या कलाकारांनी पाठ का फिरवली याची काही कारणं सध्या समोर आली आहेत. त्यापैकी सैफ आणि करीने हे सध्या सुट्टीवर आहेत. कंगना रणौत ही सध्या राजकीय करिअरमध्ये व्यस्त आहे. अनुष्का आणि विराट कोहली हे सध्या मुंबईत नाहीत. पण इतर कलाकारांनी या सोहळ्याला का अनुपस्थिति लावली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. यामधील अनेक कलाकार हे अंबानींच्या दोन्ही प्री वेडिंगला होते. पण आता महत्त्वाच्या लग्नसोहळ्यातून मात्र गायब दिसले. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. ही बातमी वाचा : Madhuri Dixit : माधुरीनं वरमाईसोबत धरला ठेका तर रितेश-जनेलियाच्या एन्ट्रीची चर्चा; अंबानींच्या लग्नात मराठमोळ्या वऱ्हाडींचा भन्नाट डान्स