Cannes Film Festival 2022 : अभिनेता आर. माधवनच्या (R Madhavan) दिग्दर्शनातील पदार्पण ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’चा (Rocketry: The Nambi Effect) भव्य प्रीमियर पॅलेस डेस फेस्टिव्हल्सच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झाला. या सोहळ्यात आर. माधवन आणि इस्रोचे प्रतिभाशाली अंतराळ शास्त्रज्ञ नंबी नारायणन (Nambi Narayan) यांनी रेड कार्पेटवर शानदार एन्ट्री केली. हा चित्रपट शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्यावर आधारित आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला टाळ्यांचा कडकडाट झाला, इतकेच नाही, तर या चित्रपटाला तब्बल 10 मिनिटांचे स्टँडिंग ओव्हेशन मिळाले.


चित्रपट महोत्सवात त्याच्या चित्रपटाला मिळालेल्या कौतुकाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना, अभिनेता-दिग्दर्शक माधवन याने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘मी भारावून गेलो आहे आणि उत्साहित आहे. टीम रॉकेट्रीमध्ये असलेल्या सर्वांसाठीच हा अभिमानाचा क्षण आहे. यासाठी मी सर्वांचा कृतज्ञ आहे. तुमच्या सर्व प्रेम आणि पाठींबा याबद्दल धन्यवाद. हा चित्रपट 1 जुलै रोजी रिलीज होणार आहे.’


पाहा पोस्ट :



‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाच्या माध्यमातून आर. माधवन बॉलिवूड दिग्दर्शकीय पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण भारत, फ्रान्स, कॅनडा, जॉर्जिया आणि सर्बियामध्ये झाले आहे. फिलिस लोगान, व्हिन्सेंट रीटा आणि रॉन डोन्ची यांच्या मदतीने आणि सुपरस्टार शाहरुख खान आणि सूर्या यांच्या कॅमिओसह, हा चित्रपट 1 जुलै 2022 रोजी हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडसह जगभरात प्रदर्शित होईल.


माधवनचे कौतुक!


या चित्रपटाचा प्रीमियर पाहिल्यानंतर प्रत्येकजण माधवनचे कौतुक करताना दिसत आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या अश्विनी चौधरी यांनी प्रीमियरचा एक व्हिडीओ शेअर करून माधवनचे कौतुक केले. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक एआर रहमान यांनीही सोशल मीडियावर माधवन आणि त्याच्या चित्रपटाचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. ट्विटरवर पोस्ट शेअर करताना रहमान यांनी लिहिले की, ‘कान्समध्ये रॉकेट्री : द नंबी इफेक्ट हा चित्रपट आत्ताच पाहिला. भारतीय चित्रपटसृष्टीला नवा आवाज दिल्याबद्दल माधवनचे आभार.’ प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनीही माधवन आणि त्याच्या चित्रपटाचे कौतुक केले.


नंबी नारायणन यांची उपस्थिती ठरली खास!


अभिनेता आणि दिग्दर्शक बनलेल्या आर. माधवनचा ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट रॉकेट सायंटिस्ट नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचा काल (20 मे) रात्री कान्स येथे प्रीमियर झाला. खुद्द नंबी नारायणन यांनी देखील या प्रीमियरला हजेरी लावली होती. त्यांची प्रेक्षकांमध्ये उपस्थिती या सोहळ्यात खास ठरली.


या चित्रपटाचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन आर. माधवन यांनी केले आहे. नुकताच, ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला, ज्यामध्ये नंबी नारायण यांना नासाकडून ऑफर मिळाल्याचे दाखवण्यात आले आहे. नंबी यांच्या जीवनावर आधारित, हा चित्रपट फ्रान्समधील कान्स चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला.


हेही वाचा :


Entertainment News Live Updates 19 May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!


Jr NTR : ज्युनियर एनटीआरच्या बिग बजेट चित्रपटाची घोषणा! धमाकेदार मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!


Cannes Film Festival 2022 : ती गुलाबी परी जणू... ‘कान्स चित्रपट महोत्सवात’ ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचा जलवा!