Kiara Advani Cannes Film Festival 2024 : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'ची (Cannes Film Festival 2024) सुरुवात झाली आहे. 11 दिवस बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंतचे कलाकार या फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपला जलवा दाखवणार आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai) काल आपल्या अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या फिल्म फेस्टिव्हलमधील ऐश्वर्या रायचे दोन लूक आतापर्यंत समोर आले आहेत. दोन्ही लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. अशातच आता कियारा आडवाणी (Kiara Advani) हिने यंदाच्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये धमाकेदार डेब्यू केला आहे. अभिनेत्री कियारा आडवाणीचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. कियाराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


'कान्स 2024'मध्ये कियाराने वेधलं लक्ष


बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कियारा आडवाणीने सोशल मीडियावर अपडेट देत एक व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. व्हिडीओमधईल कियारा आडवाणीच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 






'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये कियारा आडवाणी वाइट साटन गाऊनमध्ये दिसून आली. लोकप्रिय फॅशन डिझायनर प्रबल गुरुंगने हा लूक डिझाईन केला होता. कियारा आडवाणीचा हा लूक पाहून चाहत्यांना वेड लागलं आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये कियारा आडवाणीने ग्लॅमरचा तडका दिला. मिळालेल्या माहितीनुसार, कान्समध्ये रेड सी फिल्म फाऊंडेशन वीमेन इन सिनेमाच्या गाला डिनरमध्ये कियारा भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसून येईल.


ऐश्वर्याचा तुटलाय हात


बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने कान्सच्या रेड कार्पेटवर आपल्या अदांनी उपस्थितांना घायाळ केलं आहे. हाताला प्लास्टर असूनही ऐश्वर्याने जलवा दाखवला आहे. ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाली आहे. पण तरीही तिने कान्समध्ये सहभाग घेतला आहे. 


कोण आहे कियारा आडवाणी? (Who is Kiara Advani)


कियारा आडवाणी बॉलिवूडची लोकप्रिय सिने-अभिनेत्री आहे. कियाराने 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फगली' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण 2016 साली प्रदर्शित झालेल्या 'एम.एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाच्या माध्यमातून तिला चांगलीच ओळख मिळाली. कियारा आडवाणी सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नबंधनात अडकली आहे.


संबंधित बातम्या


Aishwarya Rai : ऐश्वर्या रायने 'कान्स 2024'मध्ये दुसऱ्या दिवशीही दाखवला जलवा; चाहते म्हणाले,"विश्वसुंदरी म्हणू की निल परी"