Aishwarya Rai in Cannes 2024 : जगभरात 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'ची (Cannes Film Festival 2024) धूम आहे. यंदाच्या 77 व्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड अभिनेत्री आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) सहभागी झाली आहे. अभिनेत्रीच्या गोल्डन ब्लॅक ड्रेसनंतर तिचा दुसरा लूक सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. ऐश्वर्या राय पूर्ण आत्मविश्वासाने निळा आणि चंदेरी टिंसेल गाऊन परिधान करत रेड कार्पेटवर आली होती. ऐश्वर्या रायच्या लक्षवेधी लूकने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. अभिनेत्रीने आपला लूक सुंदर गाऊन आणि स्मोकी ऑल वाल्या मेकअपने पूर्ण केला होता. ऐश्वर्या रायचा नवा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय नेहमीप्रमाणे यंदादेखील 'कान्स 2024'मध्ये (Cannes 2024) सहभागी झाली आहे. या फेस्टिव्हमध्ये आपल्या हटके लूकने ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ऐश्वर्याचा नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
निळा आणि सिल्वर टिंसेल गाऊन
ऐश्वर्या रायने आपल्या दुसऱ्या लूकने परदेशी मंडळींनादेखील हैरान केलं आहे. सौंदर्यासह अभिनेत्रीने तिच्या आऊटफिटला कॅरी केलं. दरम्यान कॅमेरा पर्सनला तिने फ्लाइंग किसदेखील दिली. हॉलिवूड अभिनेत्री इवा लोंगोरियासोबत तिने फोटोही काढले. अभिनेत्रीच्या आऊटफिटपासून ते एक्सप्रेशनपर्यंत सर्वकाही परफेक्ट आहे.
ऐश्वर्या रायला नुकतीच दुखापत झाली असून तिच्या एका हाताला प्लास्टर करण्यात आले आहे. पण तरीही रेड कार्पेटवर आपल्या अदा दाखवण्यात ऐश्वर्या एक पाऊल पुढे आहे. ऐश्वर्याचा दुसरा लूकदेखील फाल्गुनी शेन पीकॉकने डिझाइन केला होता. अभिनेत्रीचा हा लूक तिच्या फिगर कॉम्प्लिमेंट करत होता. सिल्वर आणि निळा शिमरी गाऊनचे ट्रेल आणि स्लीव्स त्याचे स्टाइल कोशेंट वाढवत होते.
ऐश्वर्याचा कँडिड फोटो व्हायरल
ऐश्वर्याचा कान्स लूकपेक्षा तिचा कँडिड फोटो जास्त व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ऐश्वर्या राय आपली लेक आराध्या बच्चनसोबत दिसून येत आहे. एका बाल्कनीत ऐश्वर्या आणि आराध्या कोणाचीतरी वाट पाहताना दिसून येत आहेत. कान्स लुकपेक्षा ऐश्वर्याच्या या फोटोची चांगलीच चर्चा आहे.
संबंधित बातम्या