Horror Movies And Web Series : सिनेमागृहात आणि ओटीटीवर (OTT) वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रदर्शित होत असतात. रोमँटिक (Romantic), विनोदी (Comedy) चित्रपट, वेबसीरिज पाहून तुम्हाला कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं पाहायची इच्छा असेल तर 'हॉरर चित्रपट' (Horror Movies) तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. लोकांना भयपट पाहायला जास्त आवडतं. काही चित्रपट आणि वेबसीरिज खूपच भीतीदायक असतात. काही हॉरर चित्रपट रियलिस्टिक असतात तर काही काल्पनिक. या सीरिज आणि सिनेमे पाहिल्यानंतर तुमची झोप उडेल. त्यामुळे एकट्याने या हॉरर कलाकृती अजिबात पाहू नका. या सीरिजमध्ये तुम्हाला शानदार स्टोरीलाइन आणि खतरनाक कॉन्सेप्ट पाहायला मिळेल.


घोल (Ghoul)
कुठे पाहू शकता? नेटफ्लिक्स


राधिका आपटे, मानव कॉल आणि रोहित पाठक स्टारर 'घोल' हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला होता. ही भीतीदायक सीरिज पाहताना तुम्ही थरथर कापाल. नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल. या सीरिजमध्ये राधिका आपटे आणि मानव कौल यांच्यासह महेश बलराज आणि रत्नावली भट्टाचार्जीसारखे शानदार कलाकारांचा अभिनय पाहायला मिळणार आहे. 


वीराना (Veerana) 
कुठे पाहू शकता? युट्यूब


'वीराना' हा बॉलिवूडच्या सर्वात हॉरर चित्रपटांपैकी एक आहे. 1988 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. श्याम रामसे आणि तुलसी रामसे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. चित्रपटात जैसमिन मुख्य भूमिकेत होती. तसेच राजेश विवेक उपाध्याय, हेमंत बिरज, साहिला चड्ढा, गुलशन ग्रोवर आणि कुलभूषण खरबंदा महत्त्वाच्या भूमिकेत होते. युट्यूबवर हा चित्रपट प्रेक्षकांना मोफत पाहता येईल. 


भूत (Bhoot) 
कुठे पाहू शकता? प्राईम व्हिडीओ


राम गोपाल वर्मा दिग्दर्शित भूत हा चित्रपट 2003 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अजय देवगण आणि उर्मिला मातोंडकर मुख्य भूमिकेत होते. भूत हा चित्रपट प्रेक्षकांना प्राईम व्हिडीओवर पाहता येईल.


1920
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ


'1920' हा चित्रपट 2008 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विक्रम भट्टने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात अदा शर्मा आणि रजनीश दुग्गज मुख्य भूमिकेत आहेत. प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल. 


द कान्जरिंग (The Conjuring)


द कान्जरिंग हा चित्रपट पाहताना तुमच्या अंगावर शहारे येतील. हा चित्रपट पाहताना तामिळनाडूतील एका सिनेमागृहात एका 68 वर्षीय व्यक्तीचं निधन झालं होतं. 


संबंधित बातम्या


Sahara On Scam 2010 Web Series : रिलीज होण्यापूर्वीच हंसल मेहता यांची 'स्कॅम 2010' वेब सीरिज वादात? प्रकरण कोर्टात जाण्याची शक्यता, प्रकरण काय?