Urvashi Rautela Cannes Look: कान्स फिल्म फेस्टिव्हलला 16 मे रोजी सुरुवात झाली आहे. या फिल्म फेस्टिव्हलच्या (Cannes 2023) रेड कार्पेटवर बॉलिवूड अभिनेत्रींचा जलवा पहायला मिळत आहे. यंदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये उर्वशी रौतेलानं (Urvashi Rautela) देखील हजेरी लावली होती. यावेळी तिनं केलेल्या लूकची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. उर्वशी रौतेलानं परिधान केलेल्या मगरीच्या डिझाइनच्या नेकलेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले तर, आता तिनं ओठांवर निळी लिपस्टिक देखील लावली आहे. त्यामुळे अनेक जण तिला ट्रोल करत आहेत. 


कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील इंडियाना जोन्स अँड डायल ऑफ डेस्टिनीच्या स्क्रीनिंगला  उर्वशी रौतेलानं हजेरी लावली होती.  कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी उर्वशीनं दोन खास लूक्स केला होता. त्यामधील एका लूकमध्ये तिनं  ऑफ शोल्डर क्रीम अँड  ब्लू कलरचा निळा गाऊन परिधान केला होता. तसेच तिनं डायमंड नेकलेस आणि मॅचिंग कानातले होते. यावेळी उर्वशीनं लावलेल्या लिपस्टिकनं अनेकांचे लक्ष वेधले. उर्वशीनं ब्लू कलरची लिपस्टिक लावली होती. 






कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी उर्वशी रौतेलानं आणखी एक लूक केला होता. ज्यामध्ये ती पिंक कलरच्या गाऊनमध्ये दिसली. यावेळी उर्वशीच्या गाऊनपेक्षा तिच्या गळ्यातल्या नेकलेसचीच जास्त चर्चा होत आहे. उर्वशीनं क्रोकोडाइल स्टाइलचा नेकलेस परिधान केला होता. अनेकांनी उर्वशीच्या या लूकचं कौतुक केलं. तर काहींनी तिला ट्रोल केलं. 






सारा अली खान (Sara Ali Khan),मानुषी छिल्लर (Manushi Chhillar), ईशा गुप्ता (Esha Gupta) या बॉलिवूड अभिनेत्रींनी कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर वॉक केला. 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023' चे आयोजन फ्रान्समधील फ्रेंच रिवेरा येथे करण्यात आलं आहे. 


 उर्वशीनं बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. उर्वशीने 2013 मध्ये आलेल्या 'सिंग साब द ग्रेट' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती ''सनम रे', 'ग्रेट गँड मस्ती', 'हेट स्टेरी 4' आणि 'पागलपंती' या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Cannes 2023: ऐश्वर्यानं कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी केलेल्या लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, 'चिकन शोरमा ..'