The Kerala Story Fame Adah Sharma Net Worth : 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) रातोरात स्टार झाली आहे. या सिनेमात तिच्या दोन शेड्स पाहायला मिळत आहेत. दोन्ही शेड्सच्या माध्यमातून तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.  


अदा शर्माच्या कमाईबद्दल जाणून घ्या... (Adah Sharma Net Worth)


अदा शर्मा ही मुळची तामिळनाडूची आहे. तिचे वडील भारतीय नौदलामध्ये काम करत असे. तर तिची आई शास्त्रीय नृत्यांगणा आहे. अदा शर्माला शाळेत असतानाचा अभिनयाची आणि नृत्याची गोडी लागली. अभ्यासात रस निर्माण न झाल्याने तिने शालेय शिक्षण सोडलं आणि कथ्थकमध्ये शिक्षण घ्यायला सुरुवात केली. 


अदा शर्माने 2008 साली '1920' या भयपटाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. 'हसी तो फसी','पुत्र सत्यमूर्ती','क्षणम' आणि 'कमांडो 3' या सिनेमात अदा शर्माच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार अदा शर्मा 10 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. 


'द केरळ स्टोरी'साठी अदा शर्माने किती मानधन घेतलं? (Adah Sharma The Kerala Story Fees)


'द केरळ स्टोरी' या सिनेमाची निर्मिती 40 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. या सिनेमात अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. 'द केरळ स्टोरी' या सिनेमातील शालिनी उन्नीकृष्णनची भूमिका साकारण्यासाठी अदा शर्माने एक कोटी मानधन घेतलं आहे. 


अदा शर्माच्या भूमिकांबद्दल जाणून घ्या... 


अदा शर्माने 2008 साली '1920' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या भयपटातील तिची भूमिका खूपच लक्षवेधी होती. त्यानंतर तिचा 'हंसी तो फंसी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. विनिल मैथ्यू दिग्दर्शिक या रोमॅंटिक सिनेमात ती सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रासोबत झळकली होती. त्यानंतर तिचा 'हार्ट अटॅक' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'सन ऑफ सत्यमूर्ती' या सिनेमात ती पुष्पा फेम अल्लू अर्जुनसोबत झळकली होती. 'राणा विक्रम', 'कमांडो 2', 'कमांडो 3', 'बायपास रोड', 'सेल्फी' या सिनेमांतदेखील अदा शर्मा झळकली आहे. 


अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी'चा बॉक्स ऑफिसवर धमाका


सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या सिनेमाने 171.09 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल. 'द केरळ स्टोरी'चा समावेश या वर्षातल्या ब्लॉकबस्टरर सिनेमांत झाला आहे. जगभरात हा सिनेमा चर्चेत आहे. 


संबंधित बातम्या


The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' च्या निर्मात्यांचा मोठा निर्णय; लाखो रुपये करणार डोनेट