Cannes Film Festival 2023 Manushi Chhillar Look : बहुप्रतिक्षित 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023' (Cannes Film Festival 2023) सध्या पार पडत आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय अभिनेत्रीदेखील आपल्या फॅशनने कॉन्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावत आहेत. विश्व सुंदरी मानुषी छिल्लरदेखील (Manushi Chhillar) 'कान्स 2023'मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसून आली आहे. तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 


बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि मानुषी छिल्लरने यंदा कान्समध्ये पदार्पण केलं आहे. 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'मध्ये मानुषी छिल्लरच्या लूकची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या फेस्टिव्हसाठी तिने खास व्हाइट गाऊन परिधान केला होता. विश्व सुंदरी एखाद्या परीप्रमाणे कान्समध्ये अवतरली होती. 


'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'मध्ये मानुषी छिल्लरने पांढऱ्या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला होता. या फेस्टिव्हलसाठी तिने फोवरी ब्रॅन्डची निवड केली होती. या गाऊनसोबत तिने हिरव्या रंगाचा नेकपीस घातला होता.  






मानुषीचा गाऊन बनवायला लागलेत तब्बल 800 तास...


'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'मध्ये मानुषीने परिधान केलेला व्हाइट गाऊन खूपच कमाल होता. हा गाऊन इटालिअन सिल्क आणि ट्यूलच्या 100 लेअर्सनी बनवला होता. हातमागावर हा गाउन बनवण्यात आला आहे. या गाऊनवर नाजूक नक्षीकाम करण्यात आलं होतं. हा गाउन बनवायला डिझायनरला तब्बल 800 तास लागले आहेत. 


मानुषीच्या दुसऱ्या लूकने वेधलं लक्ष


व्हाइट गाउनसह मानुषीचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'मधील दुसरा लूकदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या काळ्या रंगाच्या ऑफ शोल्डरच्या लूकमध्ये मानुषी छिल्लर खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमधील मानुषीचा गाऊन सैयद कोबेसीचा आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने ओबरीची सुंदर डिझायनर ज्वेलरी, सिल्व्हर रंगाचे शूज घातले होते आणि केस मोकळे सोडले होते. 


मानुषी छिल्लरच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या.... (Manushi Chhillar Upcoming Movies)


मानुषी छिल्लरचा 'तेहरान' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती जॉन अब्राहमसोबत झळकणार आहे. तसेच 'ऑपरेशन वैलेंटाइन' या सिनेमातदेखील ती झळकणार आहे. खिलाडी कुमारच्या (Akshay Kumar) 'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमाच्या माध्यमातून मानुषीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 


संबंधित बातम्या


Cannes Film Festival 2023: साराचा देसी अवतार तर मानुषीचा क्लासी लूक;कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचा रेड कार्पेटवर जलवा