Shubhneet Singh : भारत (India) आणि कॅनडा (Canada) वादादरम्यान बुक माय शो या ऑनलाइन तिकीट बुकिंग अॅपने गायक शुभनीत सिंहच्या (Shubhneet Singh) भारतातील सर्व मैफिली रद्द केल्या आहेत. शुभनीत सिंहच्या सोशल मीडियावरील एका वादग्रस्त पोस्टनंतर बुक माय शोने टोकाचं पाऊल उचललं आहे. 


बुक माय शोने (Book My Show) ट्वीट केलं आहे की,"गायक शुभनीत सिंहचा 'स्टिल रोलिन टूर फॉर इंडिया' हा दौरा रद्द करण्यात आला आहे. बुक माय शोने आता तिकीट खरेदी केलेल्या सर्व ग्राहकांना त्यांचे पैसे परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या सात ते आठ दिवसांत सर्वांना त्यांचे पैसे परत मिळतील. काही दिवसांपासून #UninstallBookMyshow हे ट्रेंड करत होतं. खालिस्तानींना पाठिंबा देणाऱ्या गायकाचा शो आयोजित केल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. अखेर त्यांनी हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला.






शुभनीत सिंहची पोस्ट काय होती? (Shubhneet Singh Post)


गायक शुभनीत सिंह सध्या त्याच्या गाण्यामुळे नव्हे तर वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत आहे. खालिस्तानींना पाठिंबा दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. शुभनीतने भारताला चुकीचं प्रेझेंट केल्याचा आरोप आहे. त्याने शेअर केलेल्या नकाशात देशातील केंद्रशासिक प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि पूर्वोत्तर राज्यांचा समावेश नव्हता. पोस्ट शेअर करत त्याने लिहिलं होतं,"पंजाबसाठी प्रार्थना करा". त्यानंतर या पोस्टवर भारतीय जनता युवा मोर्चाने टीका केली आणि खालिस्तानींना पाठिंबा देत असल्याचा गायकावर आरोप केला. शुभनीत सिंहसाठी एक पोस्ट महागात पडली आहे. 23 ते 25 सप्टेंबरदरम्यान मुंबईतील कॉड्रेलिया क्रूजवर त्याच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.


कोण आहे शुभनीत सिंह (Who is Shubhneet Singh)


पंजाबमध्ये जन्मलेला शुभनीत सिंह सध्या कॅनडामध्ये आहे. चाहत्यांमध्ये तो 'शुभ' या नावाने लोकप्रिय आहे. पण आता त्याचे काही चाहतेच एका वादग्रस्त पोस्टमुळे नाराजी व्यक्त करत आहेत. क्रिकेटर विराट कोहलीनेदेखील सोशल मीडियावर त्याला अनफॉलो केलं आहे. बॉलिवूडची पंगाक्वीन कंगनानेदेखील याप्रकरणावर आपलं मत मांडलं आहे. 


संबंधित बातम्या


Kangana Ranaut : कंगना रनौतला भारतीय संस्कृतीचा अभिमान; 'पंगाक्वीन' म्हणाली,"भारत' म्हणायला मला आवडतं पण कधी 'इंडिया'..."