Kangana Ranaut On India vs Bharat : देशाचं नाव बदलणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. मोदी सरकार देशाचं नाव इंडिया ऐवजी भारत (India vs Bharat) करणार असल्याचं म्हटलं जात आहे. आता बॉलिवूडची 'पंगाक्वीन' कंगना रनौतनेही (Kangana Ranaut) याबद्दल तिचं मत मांडलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली,"भारतीय असल्याचा मला अभिमान आहे". 


टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत कंगना रनौत म्हणाली,"भारतीय दिसू नये म्हणून मी आधीपासूनच शॉट्स आणि वेस्टर्न कपडे परिधान करत आहे. त्यावेळी आपल्या देशाला गरीब म्हटले जायचे. पण आता मला माझ्या संस्कृतीचा अभिमान वाटत असून साडी नेसायलाही आवडतं. संस्कृतीचं महत्त्व लक्षात आल्यानंतर ती अंगीकारायला हवी".
 
भारत म्हणायला मला आवडतं : कंगना रनौत


कंगना पुढे म्हणाली,"आपल्या देशाचा विकास होत आहे. या देशात प्रत्येक नागरिकाला त्याला काय करायचं हे ठरवण्याचा अधिकार आहे. कोणी कोणावर कोणती गोष्ट लादू शकत नाही. भारत म्हणायला मला आवडतं. पण कधी कधी चुकून मी 'इंडिया' म्हणते. मी या गोष्टीची तिरस्कार करत नाही. तो आपला भूतकाळ आहे". तसेच कंगनाने खुलासा केला की राजकीयदृष्ट्या ती जागरूक नाही किंवा बातम्याही ती पाहत नाही".  






'India Vs Bharat'दरम्यान कंगना रनौतने याआधीदेखील भाष्य केलं आहे. ट्वीट करत 'पंगाक्वीन' म्हणालेली,"इंडिया' या नावात प्रेम करण्यासारखं काय आहे? ब्रिटिशांना  'सिंधू' उच्चारता येत नव्हतं. त्यामुळे त्यांनी ते नाव बदलून 'इंड्स' केलं. त्यांनी काहींनी हिंदोस तर काहींनी इंदोस म्हटलं. अखेर शेवटी ते इंडिया म्हणायला लागले. महाभारताच्या काळापासून कुरुक्षेत्राच्या महायुद्धात सहभागी झालेली सर्व राज्ये भारत नावाच्या एका खंडाखाली आली मग ते आपल्याला इंदू सिंधू का म्हणत होते?"


कंगना पुढे म्हणालेली,"भारत' हे अर्थपूर्ण नाव आहे. जुन्या इंग्रजीमध्ये 'इंडियन' या शब्दाचा अर्थ गुलाम असा होतो. इंग्रज भारतीयांना इंडियन म्हणून लागले. मुळात इंडियन हे आपलं नाव नव्हे आपण भारतीय आहोत". कंगना रनौतसह रितेश देशमुख्, अभिमान बच्चन, जॅकी श्रॉफसह अनेक सेलिब्रिटींनी या मुद्द्यावर त्यांचं मत मांडलं आहे.


संबंधित बातम्या


Kangana Ranaut : G-20 निमंत्रण पत्रिकेवरुन कंगना रनौतचं ट्वीट; म्हणाली,"आपण भारतीय आहोत...इंडियन नाही"