Raghav Chadha-Parineeti Chopra Wedding : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) येत्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, उदयपूरयेथील लीला महालात त्यांचा शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. आता दोघांच्याही घरी प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. आता अभिनेत्रीच्या हातावर राघव चड्ढा यांच्या नावाची मेहंदी(Parineeti Chopra And Raghav Chadha Pre Wedding Celebrations) लागली आहे.  


राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा मेहंदी सोहळा पार पडला आहे. या मेहंदी सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींसह राजकीय मंडळींनीदेखील हजेरी लावली. मधु चोप्रा, सिद्धार्थ चोप्रासह हरभजन सिंहदेखील या मेहंदी सोहळ्याला उपस्थित होता. राघव आणि परिणीती यांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


मेहंदीसोहळ्यातील फोटो व्हायरल


मेहंदीसोहळ्यादरम्यान राघव आणि परिणीती पेस्टल गुलाबी रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसून आले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका फोटोमध्ये अभिनेत्रीने हात जोडलेले असून तिचे हात मेहंदीने रंगलेले आहेत. राघव आणि परिणीती यांचा मेहंदीसोहळा दिल्लीत पार पडला आहे. 






परिणीती-राघव लग्नबंधनात कधी अडकणार? (Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Date)


परिणीती चोप्रा  आणि राघव चड्ढा 23 सप्टेंबरला उदयपूरला रवाना होणार आहेत. 24 सप्टेंबरला दुपारी उदयपूरयेथील लीला महालात त्यांचा शाही लग्नसोहळा पार पडेल. 24 सप्टेंबरलाच रात्री 8.30 वाजता ग्रँड रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडेल. या लग्नसोहळ्याला बॉलिवूडकरांसह राजकीय मंडळीदेखील हजेरी लावतील.


परिणीती आणि राघव यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. सिनेमाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. पुढे त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि 13 मे 2023 रोजी साखरपुडा करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आता चाहते त्यांच्या लग्नसोहळ्यासाठी उत्सुक आहेत. परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो व्हायरल होऊ नये म्हणून कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. चड्ढा कुटुंबाची सून होण्यासाठी परिणीती सज्ज आहे. आता दोघांच्याही घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे.


संबंधित बातम्या


Udaipur: लीला पॅलेसमध्ये परिणीती-राघवचा शाही विवाहसोहळा; पर प्लेट जेवणाचा रेट ऐकून व्हाल थक्क