Bruna Abdullah Birthday Special : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी अगदी परदेशातून भारतात येत मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे ब्रूना. मॉडेल आणि अभिनेत्री  ब्रूना अबदुल्लाह परदेशातून टुरिस्ट म्हणून भारतात आली आणि बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत सलमान खानच्या चित्रपटात झळकली. ब्रूना अब्दुल्लाहचा जन्म 24 ऑक्टोबर 1986 रोजी ब्राझीमध्ये झाला. तिचा आज 24 ऑक्टोबर रोजी 37 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने तिच्याबद्दल खास गोष्टी जाणून घ्या.


अभिनेत्रीचा स्टायलिश बोल्ड अंदाज


ब्रूना अब्दुल्लाह (Bruna Abdullah) सध्या कोणत्या खास प्रोजेक्टमध्ये दिसत नसली तरी, ती सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती चाहत्यांसोबत नेहमी तिच्याबाबतचे अपडेट्स शेअर करत असते. ती इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसोबत कनेक्टेड राहते. तिच्या बोल्ड आणि स्टाईलिश अंदाजाचे अनेक चाहते आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर होतात.


न्यूड फोटोशूटमुळे अभिनेत्री चर्चेत


सोशल मीडियावर न्यूड फोटो शेअर केल्याने ब्रूना सोशल मीडियावर चर्चेत आली होती. ब्रूनाने न्यूड फोटो शेअर केल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. 2018 मध्ये ब्रूनाने न्यूड फोटोशूट केलं होतं, त्यामुळे ती चर्चेत आली होती. या फोटोशूटमध्ये ब्रूनाने टॉपलेस होत पोझ देत फोटो काढले होते. हे बोल्ड फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले होते, ज्यामुळे तिची खूप चर्चा झाली होती.


टुरिस्ट म्हणून भारतात आली आणि अभिनेत्री झाला


ब्राझीलची सुंदरी ब्रूना भारतात फिरण्यासाठी आली होती. ब्रूना अब्दुल्लाह टुरीस्ट बनून भारतात आली होती. पण, मुंबईत आल्यावर तिने विचार बदलला आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियर बनवण्याचं ठरवलं. ब्रूनाने मॉडेलिंग आणि जाहिरांतीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिला टीव्ही शो आणि चित्रपटांची ऑफर आली. 2007 साली आलेल्या नकद चित्रपटात ब्रूनाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये पहिला ब्रेक मिळाला. तिने दाक्षिणात्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.


ब्रूना अब्दुल्लाहने सलमान खानसह अनेक अभिनेत्यांसोबत काम


ब्रूना अब्दुल्लाह हिने सलमान खानसोबत स्क्रिन शेअर केली आहे. ब्रूना सलमान खानसोबत 2014 मध्ये आलेल्या जय हो चित्रपटात दिसली होती. ब्रूना अब्दुल्लाहने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. डान्सिंग क्वीन, खतरों के खिलाडी, नच बलिये 6 या शोमध्ये ती झळकली आहे. यासोबतच ती अनेक चित्रपटांमध्येही दिसली आहे. उडनछू, आई हेट लव्ह स्टोरीज, देसी बॉयज, मस्तीजादे, येतो टू मच हो गया यासारख्या चित्रपटांमध्ये ती मोठ्या पडद्यावर दिसली आहे.