Lawrence Bishnoi Confession In Salman Khan Case: अभिनेता सलमान खानला (Salman Khan) वारंवार लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. या सगळ्यामुळे प्रशासनापासून ते सलमानच्या कुटुंबियांपर्यंत सगळेच जण त्रस्त झालेत. सलमानने काळवीटाची शिकार केली म्हणून सलमान बिश्नोई गँगच्या रडावर असल्याचं म्हटलं जातंय. पण आता स्वत:लॉरेन्स बिश्नोईनेच सलमानला धमक्या का दिल्या जात आहेत, याविषयी खुलासा केलाय. 


काळवीट प्रकरणाबाबत लोक सलमान खानविरोधात सतत वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. कोणी म्हणतंय की सलमान खानने या प्रकरणी बिश्नोई समाजाची माफी मागावी, तर कोणी असंही म्हणतंय की दोघेही टीआरपी मिळवण्यासाठी हे करत आहेत. दरम्यान, एबीपी न्यूजकडे लॉरेन्स बिश्नोईचा जबाब असून तो सलमानला धमक्या का देत आहे, याविषयी स्वत: खुलासा केला आहे.


हे आहे सलमानला धमक्या देण्याचं खरं कारण


लॉरेन्स बिश्नोईने दिल्ली पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये म्हटलं की, मी मीडियामध्ये येण्यासाठीच हे केलं आहे. याशिवाय मला बिश्नोई समजातही मोठं नाव कमवायचं होतं. 


लॉरेन्स बिश्नोईचा जबाब'वासुदेव इराणी यांच्या हत्येप्रकरणी मला अटक करून जोधपूरला आणण्यात आले, तिथे मला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. सलमान खानने त्यावेळी काळवीटाची शिकार केल्यामुळे आणि कोर्टाकडून त्याला शिक्षा होत नसल्याने मी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.मी हे फक्त कॅमेऱ्यासमोर दिसण्यासाठी आणि बिश्नोई समाजात माझ्या नावासाठी केले. सलमान खानला धमकावल्याप्रकरणी मला अटकही झाली होती.


लॉरेन्स बिश्नोई यांनी 30 मार्च 2021 रोजी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला त्याचा जबाब दिलाय. 


सलमान खान धमक्यांना घाबरला नाही...


'शो मस्ट गो ऑन...' असं म्हटलं जातं, तसंच सलमान खानच्या बाबतीतही झालं आहे. इतक्या धमक्या आल्या तरीही सलमानने त्याच्या कामामध्ये कोणताही खंड पडू दिलेला नाही. गेल्या आठवड्यात तो बिग बॉस होस्ट करतानाही दिसला होता. यावेळी सलमान खूप भावूक दिसत होता. 


सलमान खानही त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटाच्या शूटिंगला परतला आहे. याशिवाय तो लवकरच 'सिंघम अगेन' या चित्रपटासाठीही त्याचा कॅमिओ शूट करणार आहे. 'सिंघम अगेन'मध्ये सलमान सुपरकॉप चुलबुल पांडेची भूमिका साकारताना दिसणार आहे. ते वाय प्लस श्रेणीच्या सुरक्षेत काम करत आहेत.


ही बातमी वाचा : 


Jaya Bachchan Mother Death: बच्चन कुटुंबावर दु:खाचा डोंगर, जया बच्चन यांना मातृशोक; इंदिरा भादुरी यांनी वयाच्या 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास