Brahmastra Twitter Review :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा ब्रह्मास्त्र (Brahmastra) हा चित्रपट शुक्रवारी (9 सप्टेंबर) रिलीज झाला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. चित्रपटात आलिया आणि रणबीरसोबतच  मिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. अयान मुखर्जीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सध्या ट्विटरवर काही नेटकरी ब्रह्मास्त्र चित्रपटाबद्दल ट्वीट शेअर करत आहेत. काहींना हा चित्रपट आवडला आहे तर काहींची या चित्रपटाला नापसंती मिळाली आहे.  


एका युझरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं, 'चित्रपट पाहिला.  कथा आवडली नाही. चित्रपटातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शाहरुख खानचा कॅमिओ. जो केवळ  20-25 मिनिटांचा आहे.'




'अयान मुखर्जीनं सर्व कलाकारांकडून चांगलं काम करुन घेतलं आहे. नागार्जुन यांची या चित्रपटातील भूमिका चांगली आहे. या चित्रपटाचे VFX आणि स्पेशल इफेक्स खूप छान आहेत.' असं ट्वीट एका नेटकऱ्यानं केलं. 




एका युझरनं ट्वीट करुन लिहिलं, 'आलिया आणि रणबीरची केमिस्ट्री चांगली आहे. हा हॉलिवूड लेव्हलचा चित्रपट आहे.'








ब्रह्मास्त्र या चित्रपटातील 'केसरिया', देवा देवा या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटाच्या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करेल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.  


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :


Brahmastra : आलिया अन् रणबीर 'ब्रह्मास्त्र'च्या स्पेशल स्क्रिनिंगला उपस्थित; चाहते म्हणाले, 'दोघे खूप मेहनत करत आहेत...’