Sita Ramam : अभिनेता दुलकर सलमान (Dulquer Salmaan), पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकुर (Mrunal Thakur) यांच्या 'सीता रामम' (Sita Ramam) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटामध्ये   60 ते 70 दशकातील लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. 5 ऑगस्ट रोजी हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेमध्ये रिलीज झाला. त्यानंतर या चित्रपटाचं हिंदी व्हर्जन 2 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आले. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघता येणार आहे. 


अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सीता रामम हा चित्रपट रिलीज होणार आहे. अॅमेझॉन प्राइमच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सीता रामम चित्रपटाबद्दल माहिती देण्यात आली आहे. अॅमेझॉनच्या पेज वरुन पोस्टर शेअर करुन त्याला कॅप्शन देण्यात आले की, 'प्रेम आणि प्रेम पत्रांची एक अतिशय गोड प्रेमकथा. सीता रामम 9 सप्टेंबरपासून अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.' हनु राघवपुडी हे या चित्रपटाचे फिल्ममेकर आहेत.


पाहा पोस्ट:






तगडी स्टार कास्ट
सीता रामम या चित्रपटामध्ये मृणालनं सीता आणि दुलकरनं राम ही भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदनानं आफरीन ही भूमिका साकारली आहे. चित्रपटामधील मृणाल आणि दुलकर सलमान यांच्या  केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. मृणालनं या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. रश्मिकाला पुष्पा या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली.  रश्मिका मंदना सध्या तिच्या बॉलिवूड एन्ट्रीची जोरदार तयारी करत आहे. लवकरच ती 'मिशन मजनू या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:


Sita Ramam : 'सीता रामम' चा हिंदी ट्रेलर प्रदर्शित; रश्मिका मंदाना, दुलकर सलमान अन् मृणालच्या अभिनयानं वेधलं लक्ष