Alia Bhatt : सध्या बॉलिवूड विश्वात अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) या जोडीची चर्चा सुरु आहे. आलिया आणि रणबीर लवकरच आई-बाबा होणार आहेत. नुकतेच आलियाने एक फोटोशूट देखील केले, ज्यात तिने आपला बेबी बंप फ्लाँट केला. आता सध्या आलियाच्या डिलिव्हरी डेटची चर्चा सुरु झाली आहे. आलियाने बेबी बंप दाखवल्यापासून चाहते आता तिच्या बाळाचे आगमन कधी होईल, याचा कयास बांधत आहेत. आलिया प्रेग्नेंसीशिवाय तिच्या ‘डार्लिंग्स’ (Darlings) आणि ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटामुळेही चर्चेत आहे. नुकतेच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या कामातून ब्रेक घेऊन सुट्टीवर गेले आहेत.


या दरम्यान आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीबाबतही नवीन बातम्या समोर येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्ट चार महिन्यांची गरोदर आहे आणि डिसेंबरच्या अखेरीस ती आपल्या बाळाला जन्म देणार आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या लग्नाच्या तीन महिन्यांतच चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. आलिया आणि रणबीरची आनंदाची बातमी ऐकून त्यांचे चाहते देखील खुश झाले आहेत.



‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे प्रमोशन सुरू


सध्या रणबीर कपूर आणि संपूर्ण कपूर कुटुंबीय आलियाची काळजी घेत आहेत. स्वतः आलिया देखील तिच्या तब्येतीची खूप काळजी घेत आहे. अभिनेत्री वेळोवेळी तिची कोरोना चाचणी देखील करून घेत असते. नुकतेच या जोडीने त्यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे. यानिमित्ताने आलियाने पहिल्यांदाच तिचा बेबी बंप फ्लाँट केला. यादरम्यान ती रणवीरसोबत ब्राऊन शॉर्ट ड्रेसमध्ये फोटो पोज देताना दिसली. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.


रणबीर-आलियाचा पहिला चित्रपट


आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीची बातमी ऐकून चाहतेही खूप उत्सुक आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच आलिया भट्टचा चित्रपट ‘डार्लिंग्स’ ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. आता रणबीर आणि आलियाचा आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ पुढच्या महिन्यात थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या दोघांचा एकत्र असा पहिलाच चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरूनच दोघांची प्रेमकहाणी सुरु झाली होती.


नुकताच रणबीर कपूरचा 'शमशेरा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. मात्र, हा चित्रपट काही खास कमाई करू शकला नाही. आता अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट रणबीरसाठी लकी ठरेल अशी अपेक्षा आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, चैतन्य अक्किनेनी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


हेही वाचा :


PHOTO : ‘मॉम टू बी’, आलिया भट्टने पहिल्यांदाच फ्लाँट केला बेबी बंप! पाहा फोटो...


Brahmastra : अयान मुखर्जीनं सांगितला 'ब्रह्मास्त्र'चा दहा वर्षांचा प्रवास; शेअर केला खास व्हिडीओ