Brahmastra Box Office Collection: बॉलिवूड स्टार आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली धूम केली आहे. या चित्रपटाची कमाई पुन्हा एकदा भरारी घेताना दिसत आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt), शाहरुख खान (Shah Rukh Khan), मौनी रॉय (Mouni Roy), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि नागार्जुन (Nagarjuna) अभिनित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’च्या (Brahmastra) रिलीजला आता एक आठवडा पूर्ण झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली होती.


पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, शनिवारी अर्थात रिलीजच्या नवव्या दिवशी चित्रपटाने एकूण 15 कोटींची कमाई केली आहे. या आकड्यानंतर चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई 191 कोटींवर गेली आहे. नवव्या दिवशी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 14 कोटींची कमाई केली आहे, तर इतर भाषांमध्ये डब केलेल्या व्हर्जनने सुमारे 1 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या नऊ दिवसांनंतर, या चित्रपटाने एकूण 191.25 कोटींची कमाई केली आहे आणि रविवारी चित्रपटाच्या कमाईत 15 टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे.


आतापर्यंतची एकूण कमाई :


दिवस 1 - 35.5 कोटी


दिवस 2 - 41 कोटी


दिवस 3 - 42.5 कोटी


दिवस 4 - 16 कोटी


दिवस 5 - 12.75 कोटी


दिवस 6 - 10.25 कोटी


दिवस 7 - 9 कोटी


दिवस 8 - 9.25 कोटी


दिवस 9 - 15 कोटी


एकूण - 191.25 कोटी (हिंदी : 170.25 कोटी, साऊथ: 21 कोटी)


सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद


अनेक नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे कौतुक करत आहेत. काहींना हा चित्रपट आवडला आहे, तर काहींची या चित्रपटाला नापसंती मिळाली आहे. चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाच्या भूमिकेने मात्र अनेकांचे लक्ष वेधले. रणबीर आणि आलिया यांच्यासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय या कलाकारांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातील 'केसरिया', ‘देवा देवा’ या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.


‘ब्रह्मास्त्र’च्या पुढच्या भागांची आतुरता


‘ब्रह्मास्त्र’ ही तीन चित्रपटांची सीरिज आहे, ज्याचा पहिला भाग ‘शिवा’ हिट झाला आहे. आता प्रेक्षक चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची अर्थात ‘देवा’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘ब्रह्मास्त्र 2’ देव आणि अमृता यांच्याभोवती फिरताना दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण देखील दिसणार आहेत, मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ‘ब्रह्मास्त्र’च्या पहिल्या भागात रणबीर आणि आलिया मुख्य भूमिकेत आहेत, जे शिव आणि ईशाच्या भूमिकेत दिसणार आहेत.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :