Prabhas & Kriti Sanon: साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. प्रभाससोबत सतत एखाद्या अभिनेत्रीचे नाव जोडले जात असते. मात्र, सध्या चर्चा रंगलीये ती क्रिती (Kriti Sanon) आणि प्रभासच्या जोडीची.. सध्या क्रिती सेनन आणि प्रभासचे नाव एकत्र जोडले जात आहेत. सोशल मीडियावरही त्यांची जोडी सध्या खूप ट्रेंड करत आहे. प्रभास आणि क्रिती सेनन एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. दोघेही लवकरच ‘आदिपुरुष’ या चित्रपटात मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.


मीडिया रिपोर्टनुसार, ‘आदिपुरुष’चे (Adipurush) शूट संपल्यानंतरही दोघांमधील नाते अजूनही घट्ट आहेत. दोघेही एकमेकांना सतत कॉल किंवा मेसेज करत असतात. दोघेही एकमेकांना पूर्ण वेळ, आदर आणि प्रेम देताना दिसतात. जेव्हा दोन सेलिब्रिटी चित्रपटात एकत्र काम करतात, तेव्हा त्यांच्या लिंक-अपच्या बातम्या नेहमीच समोर येतात. पण क्रिती आणि प्रभास याबाबतीत वेगळे आहेत. दोघेही एकमेकांबद्द्ल खूप सिरिअस आहेत.


‘आदिपुरुष’ची हवा!


क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि प्रभास (Prabhas) हे दोघेही सध्या ‘सिंगल’ आहेत. दोन्ही स्टार्स आपापल्या कामात व्यस्त आहेत. यामुळेच, त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीबद्दल चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. त्यांना एकत्र पाहण्यासाठी अनेक चाहते उत्सुक आहेत. त्याचबरोबर हे दोन्ही स्टार्सना देखील एकमेकांची सोबत खूप आवडत आहे.


दिग्दर्शक ओम राऊत ‘आदिपुरुष’चे दिग्दर्शन करणार आहेत, तर टी-सीरीज या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे आणि दोघांचेही चाहते त्यासाठी खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट 3D मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभाससोबत क्रिती सेनन, सैफ अली खान, सनी सिंह आणि वत्सल सेठ हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात व्हीएफएक्स आणि दमदार अॅक्शन सीक्वेन्स पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.


अनेक भाषांमध्ये रिलीज होणार चित्रपट


'आदिपुरुष' हा चित्रपट हिंदीसोबत तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत करणार आहेत. प्रभास व्यतिरिक्त चित्रपटात सैफ अली खान, क्रिती सेनन आणि सनी सिंह दिसणार आहेत. 'आदिपुरुष'ची कथा रामायणावर आधारित असणार आहे. 'तान्हाजी' चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक ओम राऊतने 'आदिपुरुष' या महत्त्वकांशी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात अनेक मराठी कलाकार देखील दिसणार आहेत.


हेही वाचा: