एक्स्प्लोर

कपूर घराण्याच्या तरुण पिढीसाठी बोनी कपूर दिग्दर्शनात उतरणार

भविष्यात कपूर कुटुंबियांना घेऊन एखादा चित्रपट दिग्दर्शित करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन रसिकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिले. या चित्रपटात अर्जुन कपूर, जान्हवी कपूर या बहीण भावासोबत अनिल कपूर, संजय कपूर या दोघांच्याही मुलांचा समावेश या चित्रपटात असेल आणि त्यांच्यासाठी मी दिग्दर्शन क्षेत्रातही पुनरागमन करेन, असे ते म्हणाले.

पणजी : कपूर घराण्याच्या तरुण पिढीला पुढे आणण्यासाठी चित्रपट निर्माते बोनी कपूर दिग्दर्शनात उतरणार आहेत. त्यांच्या या सिनेमात अर्जुन कपूर, जान्हवी कपूर या बहीण भावासोबत त्यांच्या काकांच्या मुलांच्याही भूमिका असणार आहेत. प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांनी बुधवारी पणजी येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये तशी इच्छा बोलून दाखवली. 'कर्न्व्हसेशन वुईथ कपूर्स' या कार्यक्रमात बोनी कपूर आणि जान्हवी कपूर ही बाप-बेटीची जोडी उपस्थित होती.

भविष्यात कपूर कुटुंबियांना घेऊन एखादा चित्रपट दिग्दर्शित करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन रसिकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिले. या चित्रपटात अर्जुन कपूर, जान्हवी कपूर या बहीण भावासोबत अनिल कपूर, संजय कपूर या दोघांच्याही मुलांचा समावेश या चित्रपटात असेल आणि त्यांच्यासाठी मी दिग्दर्शन क्षेत्रातही पुनरागमन करेन, असे ते म्हणाले.

या वेळी बोनी कपूर यांनी तांबे युग, चंदेरी युग, सुवर्ण युग आणि आता हीरकयुग सुरू असल्याचे सांगून पूर्वीपेक्षा या क्षेत्रात काम करण्याच्या अनेक पध्दती बदलल्याचे सांगितले. पूर्वी 50-60 सिनेमाघरात चित्रपट प्रदर्शित होत होते, आज ठग्ज ऑफ हिंदुस्थानसारखा चित्रपट 7000 सिनेमाघरात प्रदर्शित झाला आणि चीनमध्येही प्रदर्शित होतोय, असे सांगून भानू अथैय्या, ए. आर. रेहमान, रस्सूल पकूटी यांची उदाहरणे देत भारतीय सिनेमा तांत्रिकदृष्ट्या ऑस्करच्या तुलनेत सुरुवातीपासूनच वरचढ असल्याचे सांगितले. सहाय्यक एडिटर, सहाय्यक दिग्दर्शक अशा भूमिकेतून निर्माता झालो. अभिनयाचा प्रांत अनिल कपूरसाठी सोडल्याचे सांगून कपूरांची नवी शाखा आता सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

लेखकांची बॉलिवूडला गरज होती, आजही आहे बोनी कपूर यांनी पूर्वीही लेखकांची बॉलिवूडला गरज होती आणि आजही आहे असे सांगून लेखकांना कथा, संकल्पना पाठविण्याचे आवाहन केले.  यावेळी इंटरनेटच्या माध्यमातून निर्माते, दिग्दर्शकांशी लेखकांनी संपर्क साधावा. चांगल्या संकल्पनेवरील कथानकावर चित्रपट काढता येईल, असे आवाहन बोनी कपूर यांनी केले. अर्जुन कपूर देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होता, मात्र त्याच्या पानिपत या चित्रपटातील त्याचा लूक जाहीर होऊ नये, यासाठी त्याचे दिग्दर्शक प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अर्जुन आज उपस्थित राहू शकला नाही.

श्रीदेवीच्या आठवणीने भावविवश मुलाखती दरम्यान जान्हवी कपूर आणि बोनी कपूर दोघेही श्रीदेवीच्या आठवणीने भावविवश झाले. जान्हवी कपूरने तिच्यावर केलेली कविता सादर करुन तिच्याप्रमाणे अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमावू आणि स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करु असे सांगितले. आईच्या मृत्यूनंतर आमचा परिवार एक झाल्याचे तिने सांगितले.  ती सुपरस्टार होती. मॉमसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, पण तिच्या हयातीत तो पुरस्कार मिळायला हवा,अशी खंत बोनी कपूर यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

Rajnikant Jailer 2: रजनीकांतचा जलवा! 'जेलर 2'नं सोमवारीही सिनेमागृहात धुरळा उडवला, मोडले बरेच रेकॉर्ड्स, 5 व्या दिवशी किती कमावले?
रजनीकांतचा जलवा! 'जेलर 2'नं सोमवारीही सिनेमागृहात धुरळा उडवला, मोडले बरेच रेकॉर्ड्स, 5 व्या दिवशी किती कमावले?
Tiger Shroff Shooting: फक्त 35 हजारासाठी टायगर श्रॉफवर फायरिंग? पोलीस तपासात काय काय आढळलं? हादरवणारी माहिती समोर
फक्त 35 हजारासाठी टायगर श्रॉफवर फायरिंग? पोलीस तपासात काय काय आढळलं? हादरवणारी माहिती समोर
Salman Khan Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result 2026: जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
Farmers Death Maharashtra: कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
Vishwas Nangre Patil and Chandrashekhar Bawankule: रेशीमबागेत संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, आयुक्त विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Salman Khan Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
Nashik: अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 
Gokul Election Result: कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
Embed widget