Sridevi : बॉलिवूडची 'चाँदनी' अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांच्या निधनानं बॉलिवूडला धक्का बसला होता. श्रीदेवी यांचे निधन होऊन पाच वर्ष झाली आहेत. 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला. पण त्यांचे चित्रपट लोक आजही आवडीनं बघतात. नुकतीच श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
बोनी कपूर यांची पोस्ट
आज (23 फेब्रुवारी) बोनी कपूर यांनी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये कपूर कुटुंब दिसत आहे. फोटोमध्ये श्रीदेवी यांच्यासोबत बोनी कपूर, श्रीदेवी, बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची छोटी मुलगी खुशी कपूर, बोनी कपूर यांची बहीण रीना कपूर हे दिसत आहेत. या फोटोला बोनी कपूर यांनी कॅप्शन दिलं, 'शेवटचा फोटो' बोनी कपूर यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
गेल्या काही दिवसांपासून बोनी कपूर हे सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी श्रीदेवी यांचा फोटो शेअर केला. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'ती आपल्याला पाहात आहे.' तर दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, '5वर्षांपूर्वी तू आम्हाला सोडून गेलीस. तुझे प्रेम आणि आठवणी कायम आमच्यासोबत राहतील.'
जाह्नवी कपूरनं शेअर केली पोस्ट
बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरनं देखील श्रीदेवी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'मी अजूनही तुला सर्वत्र शोधत आहे मम्मा, तरीही मी जे काही करते ते या आशेने की, तुला माझा अभिमान वाटेल. मी कुठेही जाते, आणि जे काही करते- ते तुमच्यापासून सुरू होते आणि संपते ही.'
‘रानी मेरा नाम’ या 1972 मध्ये आलेल्या चित्रपटाद्वारे श्रीदेवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘मिस्टर इंडिया’, ‘हिम्मतवाला’, 'सोलहवा सावन' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये श्रीदेवीनं काम केलं.
महत्वाच्या इतर बातम्या :