RRR: दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटानं भारतीय चित्रपटसृष्टीचं नाव सातासमुद्रापार पोहोचवलं आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यातील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार 'आरआरआर' मधील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्यानं पटकावला. तसेच स्टीव्हन स्पीलबर्ग, जेम्स कॅमेरून आणि एडगर राइट यांसारख्या हॉलिवूडमधील दिग्गजांनी आरआरआर या चित्रपटाचं कौतुक केलं. आता हा चित्रपट अमेरिकेतील 200 हून अधिक चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय अमेरिकन डिस्ट्रीब्यूटर कंपनी वेरिएंस फिल्म्स (Variance Films) नं घेतला आहे. वेरिएंस फिल्म्सनं एक ट्वीट शेअर करुन ही माहिती दिली आहे.
वेरिएंस फिल्म्सनं (Variance Films) शेअर केलं ट्वीट
वेरिएंस फिल्म्सनं आरआरआर या चित्रपटाचा ट्रेलर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, 'आरआरआर फायनल ट्रेलर, सेलिब्रेशनला सुरुवात करुयात. एस. एस. राजामौली यांचा मास्टरपीस असलेला आरआरआर हा 3 मार्च रोजी चित्रपट 200 पेक्षा जास्त चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तिकीट आणि थिएटर्सची लिस्ट पाहा.' या ट्वीटमध्ये त्यांनी वेरिएंस फिल्म्सच्या वेब साइटची देखील लिंक दिली आहे.
पाहा ट्रेलर
आरआरआर या चित्रपटामधील नाटू नाटू या गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगिरीमधील ऑस्कर पुरस्काराचं नामांकन मिळालं आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळा 13 मार्च रोजी पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला आरआरआर चित्रपटाची संपूर्ण टीम हजेरी लावणार आहे. आता आरआरआर हा चित्रपट पुन्हा रिलीज होणार असल्यानं अमेरिकेतील नागरिकांना हा चित्रपट पाहता येणार आहे.
2022 मधील हिट आणि लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांच्या यादीत आरआरआर या पॅन इंडिया फिल्मच्या नावाचा समावेश होतो. एसएस राजामौली यांच्या या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आरआरआर चित्रपटामधील नाटू नाटू या गाण्यामधील ज्युनियर एनटीआर, राम चरणच्या एनर्जीनं आणि डान्सनं अनेकांचे लक्ष वधले, अनेक लोकांनी या गाण्याचं कौतुक केलं. या गाण्याचे संगीत एमएम किरवाणी यांनी दिले असून चंद्रबोस यांनी लिहिले.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Ram Charan : राम चरणने आनंद महिंद्रा यांना शिकवली 'नाटू नाटू'ची हूकस्टेप; व्हिडीओ होतोय व्हायरल