ABP Network Ideas of India Summit 2023: एबीपी नेटवर्कची 'आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023' (ABP Network Ideas of India Summit 2023) हा कार्यक्रम पार पडणार आहे. गेल्या वर्षी आयोजित केलेल्या 'आयडियाज ऑफ इंडिया समिट' कार्यक्रमला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता यावर्षी देखील हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. या कार्यक्रमाची यंदाची थिम 'नया इंडिया: लुकिंग इनवर्ड, रिचिंग आउट' अशी आहे. 24-25 फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम पार पडणार आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. हे व्यक्ती या कार्यक्रमात महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली मते मांडताना दिसतील.
यावर्षी, ABP नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया समिट या कार्यक्रमाची सह-प्रस्तुती डाबर वैदिक टीद्वारे करण्यात आली आहे. तसेच डॉ. ऑर्थो, गॅलंट अॅडव्हान्स आणि राजेश मसाला (मारुती सुझुकी आणि टेक पार्टनर पॅनासोनिक) हे या कार्यक्रमाचे सह-प्रायोजक आहेत.
'हे' दिग्गज लावणार हजेरी
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लिझ ट्रस, गीतकार जावेद अख्तर, गायक लकी अली आणि शुभा मुदगल, लेखक अमिताव घोष आणि देवदत्त पट्टनाईक, अभिनेत्री सारा अली खान आणि झीनत अमान, अभिनेता आयुष्मान खुराना आणि मनोज वाजपेयी, सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना, स्पोर्ट्स स्टार ज्वाला गुट्टा आणि विनेश फोगट यांसह अनेक दिग्गज 'आयडियाज ऑफ इंडिया समिट' या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.
प्रसिद्ध पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर हे देखील ABP नेटवर्क आयडियाज ऑफ इंडिया समिटमध्ये सहभागी होणार आहेत. जावेद अख्तर हे पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते आहेत. 1999 मध्ये पद्मश्री आणि 2007 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक, सलीम खान (सलमान खानचे वडील) आणि जावेद अख्तर यांच्या जोडीनं बॉलिवूडला अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले.
जावेद अख्तर आणि सलीम खान यांनी 'दीवार', 'शोले' सारखे चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आहेत. जावेद अख्तर हे देशाच्या भवितव्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा करतात. त्यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) साठी प्रचार करून राजकारणात छाप पाडली आहे. जावेद अख्तर हे अप्पर हाऊस राज्यसभेचे सदस्यही राहिले आहेत.
'आयडियाज ऑफ इंडिया समिट' या कार्यक्रमाच्या लर्निंग फ्रॉम अ लेजेंड: लेसन्स, गूड अँड बॅड या सत्रात श्री जावेद अख्तर हे त्यांच्या प्रोफेशनल लाईफ, आयुष्यात आलेले अनुभव आणि बऱ्याच विषयावर चर्चा करणार आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या :