Hamare Baarah :  विवादीत सिनेमा 'हमारे बारह' (Hamare Baarah) प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झालाय. 7 जूनला प्रदर्शित होणा-या या सिनेमाच्या रिलिजवर मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती. याचिकाकर्त्यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर सिनेमातील काही आक्षेपार्ह संवाद आणि दृश्य वगळण्याचं निर्मात्यांनी मान्य केलंय. यासंदर्भात निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टातही धाव घेतली होती, मात्र तिथून हे प्रकरण पुन्हा हायकोर्टात सुनावणीकरता वर्ग करण्यात आलं होतं. सिनेमाच्या कमाईतील काही हिस्सा सेवाभावाकरता दान करण्याचं मान्य केल्यानंतर हायकोर्टानं येत्या शुक्रवारी 21 जूनला सिनेमीच्या रिलीजला मंजूरी दिलीय.


दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हमारे बारह सिनेमाच्या टीमने एबीपी माझासोबत संवाद  साधला. यावेळी त्यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करत आनंद देखील व्यक्त केला. त्याचप्रमाणे कोर्टाने ज्या अटीशर्ती दिल्या आहेत, त्या पाळूनच सिनेमा रिलीज करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 


सिनेमाच्या टीमने काय म्हटलं?


एबीपी माझासोबत संवाद साधताना सिनेमाच्या टीमने म्हटलं की, आज आम्ही खूप आनंदी आहोत आणि त्यासाठी आम्ही उच्च न्यायालयाचं अभिनंदन करतो. हायकोर्टाने काही अटी दिल्या आहेत, त्या अटींनुसार आम्ही 21 जून रोजी सिनेमा रिलीज करणार आहोत. हा सिनेमा सगळ्यांसाठी आहे, सगळ्या धर्मांसाठी आहे. यामध्ये आमचं नुकसान झालं आहे, पण आता कोर्टाने रिलीज करण्याची परवानगी केली आहे. यामध्ये आम्हाला दोन कट सांगण्यात आलं आहेत, ते आम्ही केलेल आहेत. कोर्टाच्या निर्देशांनुसा, आम्ही टीझरही काढला होता पण आता लवकरच आम्ही नवा टीझर रिलीज करु. कोर्टाने देखील आमच्या सिनेमाचं कौतुक केलं आहे. आता कोर्टाने देखील सांगितलं आहे की, एका मिनिटाचा टीझर पाहून तुम्ही संपूर्ण सिनेमा कसा असेल ते जज करु नका. हा सिनेमा महिलांविरोधात नाही तर महिलांसाठी आहे. 


'हम दो हमारे बारह' या सिनेमात अन्नू कपूर आणि मनोज जोशी आणि अश्विनी काळसेकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सुरुवातीला या सिनेमात काही आक्षेपार्ह गोष्टी असल्यामुळे सिनेमाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर हायकोर्टाने या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा देखील केला पण त्यानंतर पुन्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण हायकोर्टात वर्ग केलं आणि आता हायकोर्टाकडून पुन्हा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. 


ही बातमी वाचा : 


Taimur Ali Khan : क्लासेसला जाणाऱ्या छोट्या तैमुरचा जेव्हा 50 जणांनी केला होता पाठलाग , त्यानंतर सैफने उचललं कठोर पाऊल