Taimur Ali Khan : बॉलीवूड (Bollywood) इंडस्ट्रीसाठी पापाराझी कल्चर फार हे मागील काही वर्षात फार महत्त्वाचं झालं आहे. सेलिब्रेटींची डेट असो, वाढदिवस, लग्न, प्रोमोशन, फिरणं हे  सगळं पापाराझी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करुन त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचवतात. त्यामुळे सध्या पापाराझी कल्चर हे बॉलीवूडसाठी फार महत्त्वाचं झालं आहे. पण या पापाराझींवर हीच सेलिब्रेटी मंडळी बऱ्याचदा चिडतात, रागवतात तर कधी विनंतीच्या स्वरात काही गोष्टी सांगतात. याबाबत पापाराझी आणि सेलिब्रेटी फोटोग्राफर रविंदर चावला यांनी काही गोष्टींचे खुलासे केले आहेत. 



त्यांनी नुकत्याच एका युट्युब चॅनलला मुलाखत दिली.  यावेळी तैमुरचा एक किस्सा सांगितला आहे. सैफ अली खान आणि तैमुरची मुलं ही अनेकांच्या आवडीची आहेत. तैमुरचेही बरेच फोटो तो लहान असताना सोशल मीडियावर तुफान व्हायरल व्हायचे. त्यामुळे करिना आणि सैफचा लेकच नाही तर तो स्वत: तैमुर म्हणूनही खूप फेमस झाला. पण याच तैमुरच्या बाबतीत एक विचित्र प्रसंग घडला होता. त्याविषयी रविंदर चावला यांनी खुलासा केला आहे. 


'आणि तैमुरच्या मागे 50 जणं लागली'


एक वेळ अशी होती की तैमुरचे फोटो पाहण्यासाठी लोकं वेडी झाली होती आणि पापाराझी त्याचे फोटो काढण्यासाठी. तो इतका क्युट होता की लोकांना तो खूप आवडायचा. करीनानेही कधी पापाराझींना फोटो काढण्यासाठी नकार दिला नाही. हळूहळू तैमुरच्या फोटोंची डिमांड वाढू लागली. त्यानंतर आम्ही 24 तास त्याच्या मागे लागायचो. आम्ही त्याच्या पाठलागच करायला सुरुवात केली होती. एकदा असंच तैमूर ट्युशनला जात होता. आम्ही सगळे त्याच्या मागे धावलो. मी बाईकवर मागे बसलो होतो आणि तेव्हा मी पाहिलं की जवळपास 40 ते 50 लोकं त्याचा पाठलाग करत होते. 


'तेव्हा वाटलं हे खूप चुकीचं आहे'


ते सगळं पाहून मीच हादरलो. ही एवढी 50 लोकं कुठून आली असा प्रश्न मला पडला. त्यातला एक जण मला म्हणाला की, पुढे फक्त तमाशा बघ. नंतर एक जण गेटवर चढला आणि इतरांनी त्याच्या गाडीला घेरलं. त्याच्यावर आता सगळेजण हल्लाच करणार आहेत, अशी स्थिती निर्माण झाली. मी स्वत: खूप घाबरलो आणि तेव्हा वाटलं  की, नाही यार.. हे सगळं चुकीचं आहे. 


सैफने उचचलं 'हे' पाऊल


पुढे त्यांनी म्हटलं की, त्यावेळी मी स्वत:च इतका घाबरलो होतो त्याची आणि त्याच्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाच करता येत नाहीये. त्यानंतर सैफने आम्हाला फोन करुन तैमूरचा पाठलाग न करण्याची विनंती केली. त्यानंतर आम्ही त्याचा पाठलाग करणं बंद केलं आणि लहान मुलांच्या बाबतीत काही मर्यादा ओलांडायच्या नाहीत, असंही आम्ही ठरवलं. 


ही बातमी वाचा : 


Siddharth Jadhav : मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं...; सिद्धार्थ जाधव स्पष्टच सांगितलं