Shraddha Kapoor-Rahul Modi Relationship :  अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) बॉलिवूडमध्ये आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. श्रद्धाने आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत अनेक चांगल्या चित्रपटात काम केले आहे. श्रद्धाच्या अभिनय कौशल्याचेही कौतुक झाले. आपल्या व्यावसायिक जीवनापासून ते वैयक्तिक आयुष्याबाबत श्रद्धा कपूर चर्चेत असते. आता श्रद्धाने आपल्या रिलेशनशीपची कबुली दिली आहे. श्रद्धाच्या अफेअरबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र, त्यावर तिने भाष्य केले नाही. आता, थेट तिने आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले. 


श्रद्धा कपूरने राहुल सोबतच्या रिलेशनची दिली कबुली...


श्रद्धा कपूरने  आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट स्टोरीवर एक पोस्ट केली आहे.  ‘तू झूठी मैं मक्कार’चा लेखक राहुल सोबत तिने आपला एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत दोघेही एकत्र दिसत आहेत. श्रद्धाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. या फोटोवर तिने कॅप्शन देत लिहिले की, ''माझं हृदय तू ठेव पण  माझी झोप मला दे यार...'' या फोटो कॅप्शनवर तिने  स्माईली आणि फनी इमोजीसह हार्ट इमोजीदेखील  पोस्ट केली आहे. या इन्स्टा स्टोरीवर तिने राहुललादेखील टॅग केले आहे.




 


श्रद्धा-राहुलच्या रिलेशनशिपची चर्चा


गेल्या वर्षी, श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या. या वर्षी मार्चमध्ये एका मित्राच्या लग्नातही दोघे गेले होते. श्रद्धा कपूरने आपल्या व्हेकेशनचे फोटो शेअर केले होते. त्याचवेळी राहुलने देखील आपले फोटो शेअर केलेले. त्यावेळी लोकेशनवरून  हे दोघेही एकाच ठिकाणी व्हेकेशनवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. 






या वर्षी मे महिन्यात श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले होते. त्यावेळी स्टारफिश आणि शंख शेल प्रिंटसह पर्पल कलरचा नाईटसूट परिधान केलेला फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये दिसत असलेल्या तिच्या पेंडंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या पेंडंटवर 'आर' हे अक्षर होते. 


'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) या सिनेाच्या शूटिंगदरम्यान श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांची जवळीक वाढली. राहुलआधी श्रद्धा फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत रिलेशनमध्ये होती. चार वर्षांच्या रिलेशननंतर त्यांचे ब्रेकअप झाले. 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाचं लेखन राहुल मोदीने केलं आहे. राहुल मोदी लोकप्रिय लेखक असून काही चित्रपटांसाठी त्याने लेखन केलं आहे.