Vinod Mehra life Story : बॉलिवूडमध्ये 70 च्या दशकात एका चॉकलेट बॉयची खूप चर्चा होती. 70 च्या दशकातील हा चॉकलेट बॉय म्हणजे विनोद मेहरा. 70 ते 80 च्या दशकातील सर्वात हँडसम अभिनेत्यांमध्ये विनोद मेहरा यांचा समावेश होता. त्यांनी बालकलाकार म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुरुवात केली आणि अभिनय तसेच मेहनतीच्या जोरादवर बॉलिवूडचा सुपरस्टार बनले. विनोद मेहरा यांनी 1950 मध्ये बालकलाकाराच्या रुपात काम केलं. त्यानंतर त्यांनी 1971 मध्ये मोठ्या पडद्यावर चॉकलेट बॉय म्हणून पदार्पण केलं आणि सर्वांना वेड लावलं.
दोन अफेयर अन् रेखासोबत गुपचूप लग्न
70 आणि 80 च्या दशकातील चॉकलेट बॉय अभिनेता विनोद मेहरा यांच्या प्रोफेशनला लाईफप्रमाणे त्यांची पर्सनल लाईफही खूप चर्चेत होती. त्यांचे दोन रिलेशनशिप होते, त्याशिवाय त्यांनी एकदा गुपचूप लग्नही केलं होतं. विनोद मेहरा यांनी साथीदाराच्या सहवास लाभावा यासाठी चार वेळा लग्न केलं, पण त्यांच्या नशीबी एकांतवासच आला. त्यांनी सुखी संसार उपभोगता आला नाही.
चार वेळा लग्न करुनही 'या' सुपरस्टारच्या नशीबी एकांतवास
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विनोद मेहरा आता या जगात नाहीत पण त्यांची जागा कोणीही घेऊ शकलेलं नाही. त्यांची कारकीर्द लहान पण चमकदार होती. दोन दशकांच्या कारकिर्दीत विनोद मेहरा यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. चार लग्न, अनेक सिनेमांमधील हिरो ते सहाय्यक कलाकार बनण्यापर्यंतची विनोद मेहरा यांची कहाणी खूपच मनोरंजक आहे.
या चित्रपटाने विनोद मेहरांचं नशीब बदललं
वर्षानुवर्षे बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर विनोद मेहरा यांना 1971 मध्ये 'एक थी रीता' चित्रपटात मुख्य भूमिका म्हणून पहिला मोठा ब्रेक मिळाला. या चित्रपटातून विनोद मेहराचे नशीब बदलले. विनोद मेहरा यांनी 'परदे के पीछे', 'एलान', 'अमर प्रेम', 'लाल पत्थर' आणि 'अनुराग' यासह अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केली. एकीकडे त्यांची फिल्मी कारकीर्द बहरत होती, तर दुसरीकडे त्यांचं वैयक्तिक आयुष्य अनेक चढ-उतारांनी गुरफटले होतं.
कालांतराने विनोदने अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, संजीव कुमार, सुनील दत्त यांच्यासह अनेक सुपरस्टार्ससोबत सेकंड लीड म्हणून काम केलं आहे. 'नागिन', 'जानी दुश्मन', 'घर', 'स्वर्ग नरक' आणि 'कर्तव्य' या चित्रपटांमध्येही ते झळकले आहेत.
सुखी संसाराची इच्छा अपूर्णच
विनोद मेहरा यांनी चार वेळा लग्न केलं होतं, पण त्यांच एक लग्न सीक्रेड मॅरेज होतं. विनोद मेहरा यांचे पहिले लग्न त्यांच्या आईनेच लावलं होतं. आईच्या इच्छेप्रमाणे त्यांनी मीना ब्रोकाशी अरेंज मॅरेज केलं होतं. पहिल्या लग्नानंतर काही काळातच विनोद यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. आजारपणातून बरे झाल्यावर, ते पुन्हा सेटवर परतल. यावेळी ते अभिनेत्री बिंदिया गोस्वामीच्या प्रेमात पडले. बिंदिया त्ंयाच्यापेक्षा 16 वर्षे लहान होती. यानंतर दोघांचे लग्न झालं, पण हे लग्न केवळ चार वर्षे टिकलं. यानंतर विनोद मेहरा पुन्हा प्रेमात पडले आणि त्यांनी तिसरं लग्न केलं. यावेळी त्यांनी किरण मेहराशी लग्न केलं. या लग्नापासून अभिनेत्याला मुलगा रोहन आणि मुलगी सोनिया अशी दोन मुले झाली. हे लग्न चांगलं चाललं होतं, पण विनोदला दुसरा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.
विनोद मेहरा यांचं सीक्रेड वेडिंग
विनोद मेहरा यांच्या चौथ्या लग्नाची सर्वाधिक चर्चा झाली. विनोद मेहरा यांनी अभिनेत्री रेखासोबत लग्न केलं होतं, पण हे नातं त्यांनी गुप्त ठेवलं होतं. यासिर उस्मानच्या 'रेखा: एन अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकानुसार, विनोद मेहरा यांनी रेखासोबत लग्नही केलं होतं, पण रेखासोबतच्या लग्नामुळे विनोद खूश नव्हता. पुस्तकात म्हटलं आहे की, लग्न झाल्यावर विनोदने रेखाला घरी आणलं तेव्हा त्याची आई खूप चिडली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :