Bhool Bhulaiya 3 Movie Review in Marathi : अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा त्याच्या सर्वात यशस्वी फ्रँचायझी म्हणजेच भूल भुलैया 3 च्या तिसऱ्या भागासह परत आला आहे, हा चित्रपट 1 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. यावेळी रुह बाबा सोबत माधुरी दीक्षित आणि विद्या बालन देखील आहेत आणि हा चित्रपट मनोरंजना सोबतच एक चांगला संदेश देतो. चित्रपट सुरु झाला तेव्हा असे वाटले की, मेकर्स चित्रपट बनवण्यापूर्वी स्क्रिप्ट विसरले होते, पण नंतर स्क्रिप्ट कुठे ठेवली होती ते आठवले आणि चित्रपट पुन्हा रुळावर आला. त्यानंतर मात्र हा चित्रपट खूप मनोरंजन करतो.


कथा


2007 पासून एक नाव लोकांच्या मनात घर करून आहे आणि ते म्हणजे मंजुलिका. आता 2024 मध्येही मंजुलिकाची कहाणी पुढे सरकताना दिसत आहे. 150-200 वर्षांपूर्वी बंगालच्या राजाने आपली कन्या मंजुलिका हिला जिवंत जाळले. पण मंजुलिका कधीही मरण पावली नाही, म्हणजेच तिचा आत्मा अजूनही जिवंत आहे आणि त्याच राजवाड्यात एका दारामागे बंद ठेवण्यात आला आहे. आता 2024 मध्ये भूत पळवणारा रूह बाबा या महालात येतो. मंजुलिकाच्या आत्म्याचा कायमचा नाश करणे, हा त्याचा उद्देश आहे जेणेकरून राजवाडा सहज विकता येईल. पण जसजशी कथा पुढे सरकते तसतशी मंजुलिकासोबत तिची बहीण अंजुलिका आणि भाऊ देवेंद्रही पुढे येतात. आता रूह बाबा या सगळ्याचा सामना कसा करेल, हीच चित्रपटाची कथा आहे. या सगळ्यामध्ये रूह बाबाही राजघराण्यातील एका मुलीच्या प्रेमात पडतो.


चित्रपट कसा आहे?


चित्रपटाची सुरुवातच इतकी खराब झाली आहे की, कदाचित निर्माते चित्रपटाची स्क्रिप्ट लिहायला विसरले असावेत, असे वाटते. म्हणजे सुरुवातीला जे काही चालले आहे, ते काही समजत नाही, लोकांना हसवण्याचा प्रयत्न फसला, पण नंतर माधुरी दीक्षितच्या एंट्रीने , चित्रपटाचा जिवंतपणा परत येतो आणि चित्रपट उत्तरार्धात खूप मनोरंजन करतो. विद्या आणि माधुरीने चित्रपटात नव्याने जीव फुंकला आहे. चित्रपटातील कॉमेडी जरी फार मजेदार नसली तरी, कॉमिक पंच हलका आहे. पण ट्विस्ट आणि संदेश चित्रपट तुमचे मनोरंजन करतो.  कार्तिकने पूर्वीच्या भूल भुलैयामध्ये जे केले होते तेच करत आहे, असे वाटते पण नंतर कार्तिक आश्चर्यचकित करतो आणि चित्रपट एक मनोरंजक नोटवर संपतो.


अभिनय


कार्तिक आर्यनचा अभिनय चांगला आहे, पण काही ठिकाणी तो अजूनही अक्षय कुमारची नक्कल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. पण कार्तिकवर अनेक मीम्स बनणार आहेत, एवढं मात्र नक्की. माधुरी दीक्षित चित्रपटात अप्रतिम दिसली, आजही तिची स्क्रीनवरील उपस्थिती अप्रतिम आहे, तिचा अभिनयही अप्रतिम आहे. विद्या ही एक अप्रतिम अभिनेत्री आहे आणि इथे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, ती माधुरीपेक्षा कमी नाही, तृप्ती डिमरीचे काम सरासरी आहे. विजय राजचे काम चांगले आहे. संजय मिश्रा, राजपाल यादव आणि अश्विनी काळसेकर हे त्रिकूट अपेक्षित मजा देत नाही, छोटा पंडित राजपाल यादव फक्त निराश करतो.


दिग्दर्शन


'भूल भुलैया 3' चे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले आहे. अनीस पार्ट 1 पासून चित्रपटाशी जोडले गेले आहेत. दिग्दर्शकाला चित्रपटाच्या पूर्वार्धात अधिक काम करण्याची गरज होती, दुसऱ्या उत्तरार्धानंतर चित्रपट चांगला होतो, पण जर प्रेक्षकांनी पूर्ण पैसे दिले तर त्याला पूर्ण मनोरंजनही अपेक्षित आहे. एकंदरीत दिवाळीत हा चित्रपट कुटुंबासोबत पाहता येणार आहे.


रेटिंग : 3 स्टार