Actress Rekha Life Story : बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री रेखा हिचा आज 10 ऑक्टोबर वाढदिवस आहे. बॉलिवूडची 'उमराव जाव' म्हणजेच अभिनेत्री रेखा 70 वर्षांची झाली आहे. अभिनेत्रा रेखा यांचं प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सन लाइफ कायमच चर्चेत राहिलं आहे. रेखा यांचं खरं नाव भानुरेखा गणेशन आहे. त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षीपासून इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली. अभिनेत्री रेखाचे आजही तितकेच चाहते आहेत, जितके आधी होते. रेखाच्या सुंदरतेची आणि साधेपणाची जगभरात चर्चा आहे.
अभिनेत्री रेखाचा 70 वा वाढदिवस
वयाच्या 70 व्या वर्षीही रेखा खूप सुंदर दिसते. तिचं सौंदर्य एखाद्या तरुणीला लाजवणारं आहे. अभिनेत्री रेखा सोशल मीडियावर अजिबात सक्रिय नसली तरी तिचे फोटो नक्कीच व्हायरल होतात. रेखा तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. रेखाला तुम्ही नेहमी सिंदूर लावताना पाहिलं असेल. रेखाचा पती मुकेश अग्रवाल याचं निधन झालं आहे, पण तरीही रेखा सिंदूर का लावते? हा प्रश्न अनेकांना पडला असेल, तर त्याचं उत्तर जाणून घ्या.
रेखा सिंदूर का लावते?
रेखाचे पती मुकेश अग्रवाल याने लग्नानंतर अवघ्या सात महिन्यानंतरच आत्महत्या केली. पतीच्या निधनानंतर रेखा भांगात कुंकू भरते. एकदा खुद्द राष्ट्रपतींनीही रेखाला भांगात कुंकू भरण्याचं कारण विचारलं होतं. याचा उल्लेख 'रेखा द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकात करण्यात आला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती सर्वांना सन्मानित करत होते. रेखाला उमराव जान या कल्ट फिल्मसाठी हा सन्मान मिळाला होता. त्यादरम्यान तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी रेखाला विचारलं, 'तुम्ही भांगात सिंदूर का भरता?' यावर रेखाने 'ही फॅशन आहे' असं उत्तर दिलं होतं.
रेखावर लिहिलेल्या 'रेखा द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकानुसार, निमित्त होते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे. पारंपारिक राष्ट्रपती सर्वांचा सन्मान करतात. रेखाला 1981 मध्ये 'उमराव जान' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. रेखा पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर पोहोचली. यावेळी तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी विचारलं की, 'तुम्ही मांग सिंदूर का भरता?' यावर रेखानं उत्तर दिलं होतं, 'मी ज्या शहरातून आले आहे, जिथे भांगात सिंदूर भरणं ही एक सामान्य गोष्ट आहे. ही फॅशन आहे!'
महत्त्वाच्या इतर बातम्या :