Vishal Punjabi on Bollywood Stars Celebrity : बॉलिवूड सेलिब्रिटींचं आयुष्य कायमच चर्चेत असते. बॉलिवूड कलाकाराच्या प्रोफेशनल लाईफसोबत वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चा होतच राहते. फिल्म इंडस्ट्रीमधून ब्रेकअप, घटस्फोट अशा बातम्या समोर येत असतात. सेलिब्रिटी वेडिंग फिल्ममेकरने बॉलिवूड सेलिब्रिटींबाबत मोठा खुलासा केला आहे. सेलिब्रिटी वेडिंग फिल्ममेकर विशाल पंजाबीने एक अभिनेता आणि त्याच्या पत्नीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. विशालने एका मुलाखतीत सांगितलं की, एक अभिनेता त्याच्या लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यानंतरच दुसऱ्या अभिनेत्रीसोबत आक्षेपार्ह परिस्थिती पकडला गेला होता. त्या अभिनेत्या पत्नीने त्याला रंगेहाथ पकडलं होतं.
लग्नाच्या दोन महिन्यांनंतर अभिनेत्याकडून पत्नीची फसवणूक
विशाल पंजाबीने इंडस्ट्रीतील एक अभिनेत्याबद्दल धक्कादायक गुपित उघड केलं आहे. विशालने सांगितलं की, एका अभिनेत्याला त्यांच्या लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांतच पत्नीची फसवणूक करताना रंगेहाथ पकडला गेला होता. त्याने पुढे सांगितलं की, एका जोडप्याने मला आजपर्यंत माझ्या कामाचे पैसे दिलेले नाहीत. अलीकडेच डीजे सिमझ यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने हा गौप्यस्फोट केला आहे.
वेडिंग फिल्ममेकरकडून मोठा खुलासा
यूट्यूब चॅनलवर विशाल पंजाबीने इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्यांची गुपितं उघड केली आहे. त्याला विचारण्यात आलं होतं की, त्याने कधीही अशा जोडप्याच्या लग्नाचं चित्रीकरण केलं आहे, जे आता एकत्र नाहीत आणि त्यांचा घटस्फोट झाला आहे. यावर उत्तर देताना विशाल म्हणाला, 'हो, एक सेलिब्रिटी आहे. जो लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच पत्नीची फसवणूक करताना पकडला गेला. त्याच्या पत्नीने त्याला मेकअप व्हॅनमध्ये एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत रंगेहात पकडलं. दोघे आक्षेपार्ह अवस्थेत असताना अभिनेत्याची पत्नी तिथे पोहोचली आणि त्याचं पितळ उघड पडलं.
एका जोडप्याने व्हिडीओ घेण्यास नकार दिला
विशालने पुढे सांगितलं की, मी लग्नाच्या व्हिडीओसाठी अभिनेत्याला फोन करत होतो, त्याने माझा फोनही उचलला नाही. मग मी नवरीला फोन केला, ती म्हणाली की, तिला लग्नाचा व्हिडीओ नको आहे. यानंतर मी त्यांच्या मॅनेजरला फोन केला. तो म्हणाला, आम्हाला व्हिडीओ नको आहे. मग मी विचार केला की या वेडिंग व्हिडीओचं काय करावं? मी ही व्हिडीओ नेटफ्लिक्सला विकण्याचाही विचार केल्याचं त्याने सांगितलं.
विशाल पंजाबी बॉलिवूडमधील प्रसिद्ध वेडिंग फिल्ममेकर आहे. विशालने अनेक सेलिब्रिटींचं वेडिंश शूट केलं आहे. विशालने दीपिका पदुकोण-रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा-विराट कोहली यांच्यासह अनेक स्टार्सच्या लग्नाचं शूटिंग केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :