Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce : 'ऐश्वर्याला माझ्या परवानगीची गरज नाही', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेक बच्चनचं जुनं ट्वीट व्हायरल
जयदीप मेढे | 19 Jul 2024 10:11 PM (IST)
Abhishek Bachchan Tweet Viral : ऐश्वर्या रायसोबत घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेक बच्चनचं जुनं ट्वीट व्हायरल होतं आहे, ज्यामध्ये तो म्हणाला होता की, तिला माझ्या परवानगीची गरज नाही.
Abhishek Bachchan Tweet for Aishwarya Rai Goes Viral
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या (Divorce) बातम्या चर्चेत आहेत. या दोघांमध्ये दुरावा आला असल्याचं बोललं जात आहे. अलिकडे अभिषेक बच्चनने घटस्फोटासंबंधित एक पोस्ट लाईक केल्यानंतर या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, अंबानींच्या कार्यक्रमातही ऐश्वर्य आणि अभिषेक पोहोचले होते, पण दोघांनी कॅमेऱ्यासमोर एकत्र पोझ दिली नव्हती, तेव्हाही अनेकाच्या मनात संशयाची पाल चुकचूकली होती. आता दोघांचं नात संपलं असल्याचं बोललं जात आहे.
अभिषेक ऐश्वर्याच्या घटस्फोटाची चर्चा
अभिषेक बच्चनने घटस्फोटासंबंधित पोस्ट लाईक केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला, तेव्हापासून या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना आता अभिषेक बच्चनचं जुनं ट्वीट व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायबद्दल त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या.
अभिषेकचं जुनं ट्वीट व्हायरल
अभिनेता अभिषेक बच्चनने 'पोन्नियिन सेलवन 2' चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केला होता. या चित्रपटात ऐश्वर्याने पझुवूरची राण नंदिनी ही भूमिका साकारली होती. याबद्दल ट्वीट करताना ऐश्वर्या रायचं कौतुक केलं होतं. अभिषेकने ट्वीट करत लिहिलं होतं की, "#PS2 शानदार आहे. याचं कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे आहे. अदभूत आहे. संपूर्ण टीम मणिरत्नम, चियान, जयमरवी, कार्ती यांच्यासह सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्सचं अभिनंदन. माझ्या श्रीमतीवर मला गर्व आहे. ही आतापर्यंतची ऐश्वर्या राय बच्चनची सर्वश्रेष्ठ भूमिक आहे."
फॅनची कमेंट, अभिषेकचं प्रत्युत्तर
अभिषेक बच्चनच्या या ट्वीटवर एका चाहत्याने त्याने कमेंट करत लिहिलं होतं की, "जसं तुम्ही करयला हवं तसं! आता तिला आणखी चित्रपट साइन करू द्या आणि तुम्ही आराध्याची काळजी घ्या." अभिषेक बच्चनने यावर प्रत्युत्तर देत म्हटलं होतं की, "तिला सही करू द्या? सर, तिला काहीही करायला माझ्या परवानगीची नक्कीच गरज नाही. विशेषत: जे करायला तिला आवडतं त्यासाठी." अभिषेकचं हे जुनं ट्वीट आता पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांकडून पुन्हा अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
'तिला माझ्या परवानगीची गरज नाही'
अनंत आणि राधिकाच्या लग्नात अभिषेक आणि ऐश्वर्या वेगवेगळे
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं 12 जुलैला राजेशाही थाटात लग्न झालं. या लग्नात देश-विदेशातील अनेक दिग्गज सेलिब्रिटी, नेते, पुढाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी अभिषेक आणि ऐश्वर्याही लग्नाला हजर होते, पण दोघेही एकत्र दिसले नाहीत. अभिषेक बच्चन त्याच्या संपूर्ण कुटुंबासह लग्नाला उपस्थित होता, तर ऐश्वर्या तिची मुलगी आराध्या बच्चनसोबत पोहोचली होती. या लग्नात ऐश्वर्या बच्चन कुटुंबासोबत दिसली नाही. या लग्नानंतरच अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा पुन्हा एकदा जोरात आली. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.