Sherlyn Chopra : बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) सध्या चर्चेत आहे. शर्लिनने एका फायनान्सरविरोधात मुंबईच्या जुहू पोलीस (Juhu Police Station Mumbai) ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 


नेमकं प्रकरण काय? 


शर्लिन चोप्राने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, एका फायनान्सरने एका व्हिडीओच्या रेकॉर्डिंगसाठी शर्लिनला बोलावलं होतं. त्यावेळी त्याने तिच्यासोबत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शर्लिनने विरोध करायला सुरुवात केली. त्यावेळी तो तिला घाणेरड्या शिव्या देऊ लागला. तसेच त्याने तिला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली. 


शर्लिन चोप्राच्या तक्रारीनुसार पोलिसांनी फायनान्सरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आयपीसी कलम 354,506,509 नुसार गुन्हा नोंद केला असून सध्या ते याप्रकरणाचा तपास घेत आहेत. फायनान्सरने एका व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी पैसे देण्याच्या बहाण्याने शर्लिनसोबत जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने अभिनेत्रीला अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. 






शर्लिन चोप्रा कायम चर्चेत!


शर्लिन चोप्राने याआधी सिने-दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. #MeToo या मोहिमेअंतर्गत अभिनेत्रीने लैंगिक छळाचा खुलासा केला होता. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी तिने बॉलिवूडची ड्रामाक्वीन राखी सावंतविरोधातदेखील तक्रारदेखील केली होती. 






शर्लिन चोप्राबद्दल जाणून घ्या... (Who Is Sherlyn Chopra)


हैदराबादमध्ये जन्मलेली शर्लिन चोप्रा एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबत मॉडेलदेखील आहे. तिने 2005 साली 'टाइमपास' या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर अनेक हिंदी सिनेमांत अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. रुपेरी पडद्यासह छोट्या पडद्यावरदेखील तिने काम केलं आहे. छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस' (Bigg Boss) या लोकप्रिय कार्यक्रमातील तिसऱ्या पर्वात ती सहभागी झाली होती. तसेच एमटीव्हीच्या 'स्पिल्ट्सविला' कार्यक्रमातदेखील ती दिसली होती. 


संबंधित बातम्या


Pornography Case: राज कुंद्राला अटकपूर्व जामीन मंजूर, शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडेलाही दिलासा