Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Ambedkar Jayanti 2023) यांची 14 एप्रिलला जयंती असून मोठ्या उत्साहात त्यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर यांची जयंती अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असून आता देशभरात भीम जयंतीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. बाबासाहेबांवर अनेकांनी गाणी म्हटली असून आज जाणून घ्या त्यापैकी 10 गाण्यांबद्दल...


1. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं : 'तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं' हे गाणं कडूबाई खरात यांनी गायलं आहे.



2. लाल दिव्याचा गाडीला : 'लाल दिव्याच्या गाडीला' हे गाणं गायक आनंद शिंदे यांनी गायलं आहे. तर हर्षद शिंदे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. युट्यूबवर या गाण्याला 25,658,063 व्ह्यूज मिळाले आहेत. 



3. भीमराव एक नंबर : 'भीमराव एक नंबर' हे गाणं आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांनी गायलं आहे. 



4. तुला देव म्हणावं की भिमराव म्हणावं : आनंद शिंदे यांनी 'तुला देव म्हणावं की भिमराव म्हणावं' हे गाणं गायलं आहे. तर पी. कुमार धनविजय यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून निलेश गरुड यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. 



5. निळ्या निशाणा खाली : 'निळ्या निशाणा खाली' हे गाणं आनंद शिंदे यांनी गायलं असून प्रल्हाद शिंदे यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. 



6. माया भिमानं सोन्यानं भरली ओटी : 'माया भिमानं सोन्यानं भरली ओटी' हे गाणं कडूबाई खरात यांनी गायलं आहे. 



7. लई मजबूत भिमाचा किल्ला : अरुण येवळे आणि प्रवीण येवळे यांनी 'लई मजबूत भिमाचा किल्ला' हे गाणं गायलं आहे. 



8. हे खरचं आहे खरं : 'हे खरचं आहे खरं' हे गाणं शाहीर विठ्ठल उमप यांनी गायलं आहे. हरेंद्र जाधव यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.



9. मायबापाहून भीमाचे उपकार लई हाय रं : 'मायबापाहून भीमाचे उपकार लई हाय रं' हे गाणं कडूबाई खरात यांनी गायलं आहे. 



10. सोनियाची उगवली पहाट : 'सोनियाची उगवली पहाट' हे गाणं आनंद शिंदे यांनी गायलं आहे.



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. आंबेडकर हे आपल्या देशातील आघाडीचे आणि महान समाजकार्य केलेले महापुरष म्हणून ओळखले जातात. ते जागतिक दर्जाचे वकील आणि  समाजसुधारक होते. आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील एका गरीब कुटुंबात झाला होता. 


 


संबंधित बातम्या


PHOTO : महामानवाला अनोखी मानवंदना; पिंपळाच्या पानावर साकारलं बाबासाहेबांचं आकर्षक चित्र