Bollywood Richest Item Girl : बॉलिवूड चित्रपटांसह (Movies) त्यातील आयटम साँगदेखील (Item Song) प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. बॉलिवूड चित्रपटांतील आयटम साँग (Item Song) प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करतात. या आयटाम साँगमध्ये बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री आयटम साँगवर थिरकताना दिसून येतात. एका आयटम साँगच्या माध्यमातून या 'आयटम गर्ल' (Item Girl) चांगलीच कमाई करतात. 50 च्या दशकापासून हिंदी चित्रपटांतील 'आयटम साँग' प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.  हेलेन, बिंदू सारख्या अभिनेत्री या डान्स नंबर्सच्या माध्यमातून चित्रपट सुपरहिट करतात. 50 च्या दशकापासून सुरू झालेला 'आयटम साँग'चा प्रवास आजही कायम आहे. बॉलिवूडचे अनेक दिग्दर्शक आपल्या चित्रपटांत आवर्जुन 'आयटम साँग' ठेवतात. पण बॉलिवूडची सर्वात महागडी 'आयटम गर्ल' (Bollywood Richest Item Girl) कोण हे तुम्हाला माहिती आहे का? बॉलिवूडची ही 'आयटम गर्ल' चित्रपटातील मुख्य नायिकेपेक्षा जास्त मानधन आकारते. 


बॉलिवूडची सर्वात महागडी आयटम गर्ल कोण? (Who is Bollywood Richest Item Girl) 


बॉलिवूडची सर्वात महागडी आयटम गर्ल दुसरी तिसरी कोणी नसून सनी लिओनी (Sunny Leone) आहे. हिंदी चित्रपटांतीव सर्वाधिक मानधन घेणाऱ्या 'आयटम गर्ल'मध्ये सनी लिओनी आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खान (Shah Rukh Khan) स्टारर 'रईस' या चित्रपटातील 'लैला' या आयटम साँगसाठी सनीने 3 कोटी रुपये चार्ज केले होते. फक्त चार मिनिटांच्या गाण्यावर थिरकण्यासाठी सनीने 3 कोटी रुपयांचं मानधन घेतलं होतं. 


सनी लिओनी एका डान्स नंबरचे किती मानधन घेते? (Sunny Leone Most Expensive Item Girl)


मीडिया रिपोर्टनुसार, 'रागिनी एमएसएस 2'मध्ये 'बेबी डॉल' या गाण्यासाठी सनीने आणखी मानधन आकारलं होतं. पण या चित्रपटात आयटम साँग करण्यासोबत सनी प्रमुख भूमिकेत होती. सनी एका गाण्यावर थिरकण्यासाठी 'डान्सिंग क्वीन' नोरा फतेहीपेक्षा (Nora Fatehi) जास्त मानधन घेते. आपल्या प्रत्येक गाण्यासाठी सनी 2 कोटी रुपये चार्ज करते.


देशातील महागडी 'आयटम गर्ल' कोण? (Richest Item Girl in India)


बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif), करीना कपूर (Kareena Kapoor) आणि जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) एका गाण्यासाठी 1.5-2 कोटी रुपयांचं मानधन घेतात. तसेच सनी लिओनी देशातील सर्वात महागडी आयटम गर्ल नाही आहे. तेलुगू स्टार समंथा रुथ प्रभूने (Samantha Ruth Prabhu) 'पुष्पा द राइज' (Pushpa : The Rise) या चित्रपटातील ब्लॉकबस्टर 'ऊ अंटावा' (Oo Antava) गाण्यासाठी पाच कोटी रुपयांचं मानधन घेतलं होतं. त्यामुळे समंथा रुथ प्रभू देशातील सर्वात महागडी 'आयटम गर्ल' आहे.


संबंधित बातम्या


Cannes Film Festival : 'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' फिल्म मार्केटसाठी राज्य शासनाकडून 'जिप्सी','भेरा'आणि 'वल्ली' या तीन मराठी चित्रपटांची निवड