नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान हे मुंबईत राहत असले तरी दिल्लीबाबत त्यांच्या अनेक आठवणी आहेत. दोघांचं बालपण, दोघींची भेट दिल्लीतच झाली. शाहरुख खानचं मुंबईतील मन्नतप्रमाणेच दिल्लीतही एक आलिशान घर आहे. हे घर काही दिवसांपूर्वीच गौरी खानने रिडिझाइन केलं आहे. त्याचे फोटो शाहरुख खानने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून शेअर केले आहेत. अशातच अनेक फॅन्स शाहरुखच्या घराच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत. शाहरुख खानचं हे आलिशान घर साऊथ दिल्लीतील पंचशील पार्कमध्ये आहे.
शाहरुख आणि गौरी दिल्लीमधील आपल्या घरात एका जोडप्याला एका रात्रीसाठी राहण्याची संधी देत आहे. परंतु, त्यासाठी जोडप्यांना अर्ज करावा लागणार आहे. या कॅम्पेनला शाहरुख खानची प्रसिद्ध पोजच्या आधारावर 'होम विथ ओपन आर्म्स' असं नाव देण्यात आलं आहे. या मोहीमेसंदर्भात सांगताना गौरी खान म्हणाली की, घरात तिची आणि शाहरुखची लव्ह स्टोरी तसेच त्यांची मुलं आर्यन, सुहाना तसेच अबराहमसोबत त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची झलक पाहायला मिळते.
13 फेब्रुवारीला मिळणार एका जोडप्याला संधी
शाहरुख आणि गौरी खानच्या या घरात रात्रभर राहण्याची संधी जिंकण्यासाठी चाहते अर्ज करू शकतात. या मोहीमेची सुरुवात 18 नोव्हेंबर रोजी करण्यात आली आहे. विजेत्या जोडप्याला 13 फेब्रुवारी 2021 रोजी, म्हणजेच व्हेलेंटाईन डेच्या आधल्या दिवशीच्या रात्री शाहरुखच्या घरात राहायला मिळणार आहे. शाहरुखचं दिल्लीतील घर त्याची पत्नी गौरी खानने डिझाइन केलेलं आहे. त्याचे काही फोटो शाहरुखने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केले होते.
दरम्यान, शाहरुख खान मुंबईमध्ये आपल्या 200 कोटींचं घर मन्नतमध्ये राहतो. पण किंग खानचं दिल्लीतही एक घर आहे. शाहरुख खानचं दिल्लीतील घर त्याची पत्नी गौरी खानने डिझाइन केलं आहे. ज्याचे काही फोटो शाहरुख खानने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये फॅन्सना शाहरुख खानच्या घराची झलक पाहायला मिळत आहे. त्याचसोबत शाहरुखच्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो घरात लावण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- शाहरुख खानचं दिल्लीतील घर पाहिलं का? मन्नतपेक्षाही सुंदर; आलिशान बंगल्याचे फोटो व्हायरल
- शाहरुखच्या 'पठाण'मध्ये सलमानची एंट्री होणार!