Bollywood Box Office Prediction :  बॉलिवूडसाठी (Bollywood) 2024 हे वर्ष खास असलं तरी या वर्षात हिंदी सिनेसृष्टीला मोठा फटका बसणार आहे. अनेक सुपरस्टार्सचे सिनेमे 2024 मध्ये रिलीज होणार नाहीत. त्यामुळे बॉलिवूडचं 1500 कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान होणार आहे. 


बॉलिवूडच्या अनेक सिनेमांनी 2023 हे वर्ष गाजवलं. बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी पैशांचा पाऊस पाडला. गेल्यावर्षी शाहरुख खान (Shah Rukh Khan), सनी देओल (Sunny Deol), रणबीर कपूर (Ranbir Kapoor) असे अनेक कलाकारांचे सिनेमे प्रदर्शित झाले. जवान, गदर 2, अॅनिमल सारख्या सिनेमांनी भारतीय बॉक्स ऑफिसवर 500 कोटींपेक्षा अधिक कमाई केली.


बॉलिवूडचं होणार 1500 कोटींपेक्षा अधिक नुकसान


बॉलिवूड सुपरस्टारसह कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'सत्यप्रेम की कथा', पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांचा 'ओएमजी 2' (OMG 2), आयुष्मान खुराना यांचा ड्रीम गर्ल 2, पुलकित सम्राटचा फुकरे 3 हे सिनेमेदेखील 2023 मध्ये रिलीज झाले. या सर्व सिनेमांनी बॉक्स ऑफिस चांगलच गाजवलं. आता 2024 मध्ये या चार सुपरस्टार्सचे सिनेमे रिलीज होणार नसल्याने बॉलिवूडचं 1500 कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं, असं म्हटलं जात आहे.


शाहरुख खानचे 'जवान', 'पठाण' आणि 'डंकी' हे सिनेमे 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आले. बॉक्स ऑफिसवर या तीन सिनेमांनी चांगलाच धमाका केला. आता त्याचा 'टायगर वर्सेस पठाण' हा सिनेमा 2025 मध्ये रिलीज होणार आहे. त्यामुळे यावर्षात किंग खानचा कोणताही सिनेमा प्रदर्शित होणार नाही.


सलमान खानने बॉक्स ऑफिसवर केलेली 396 कोटींची कमाई


सलमान खानचे 'किसी का भाई किसी की जान' आणि 'टायगर 3' हे सिनेमे 2023 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झाले. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हे दोन्ही सिनेमे कमी पडले. आता भाईजानचा 'टायगर वर्सेस पठाण' आणि विष्णु वर्धनचा अॅक्शनपट 2025 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.


रणवीर सिंहने केली 153 कोटींची कमाई


रणवीर सिंहच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाने देशापेक्षा परदेशात जास्त कमाई केली आहे. आता 'सिंघम अगेन' या सिनेमाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीरचा 'डॉन 3' हा बिग बजेट सिनेमा 2025 मध्ये रिलीज होणार आहे. 


रणबीर कपूरने केली 683 कोटींची कमाई


रणबीर कपपूचे अमरनाथ बायोपिक आणि ब्रह्मास्त्र 2 हे सिनेमे रिलीजसाठी सज्ज आहे. त्याचा रामायण हा सिनेमा 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. 


संबंधित बातम्या


Salaar 2 : प्रभासच्या 'सालार 2'बाबत मोठी अपडेट समोर; 2025 मध्ये रिलीज होणार सिनेमा