Salaar 2 Release Date : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. 'सालार' या सिनेमाला देशभरातील सिनेप्रेमींचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 'सालार'चा दुसरा भागदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी या सिनेमासंदर्भात भाष्य केलं आहे.


सुपरस्टार प्रभास आणि श्रुती हासन अभिनीत 'सालार' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रशांत नीलने (Prashanth Neel) सांभाळली आहे. एकीकडे हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत असताना आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाचीदेखील चर्चा सुरू झाली आहे. 


'सालार 2' कधी रिलीज होणार? (Salaar 2 Release Date)


'सालार 2' हा सिनेमा 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  निर्माते विजय किरगंदुर यांनी 'सालार 2' या सिनेमाची संहिता तयार केली आहे. त्यामुळे लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होईल. येत्या काही दिवसांत या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. 2025 च्या शेवटापर्यंत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.


प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार' ही दोन मित्रांची गोष्ट आहे. एकमेकांचे खास मित्र पुढे कसे दुश्मन होतात हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. या सिनेमातील प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन या दोन्ही कलाकारांनी आपली भूमिका चोख निभावली आहे. या सिनेमात श्रृती हासनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 


प्रभासच्या 'सालार'ने बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस


'सालार' हा सिनेमा 22 डिसेंबर 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पाच भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) या सिनेमाचा रेकॉर्ड प्रभासच्या सालारने ब्रेक केला आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे.


तगडी स्टारकास्ट असलेला प्रभासचा 'सालार'


'सालार' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. प्रशांत नीलने (Prashant Neel) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारनसह या सिनेमात श्रुती हासन, जगपती बाबू, माइम गोपी, श्रिया रेड्डीसह अनेक कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'सालार' या सिनेमाला जगभरातील प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस या सिनेमाची क्रेझ वाढत चालली असून बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलच कलेक्शन जमवत आहे.


संबंधित बातम्या


Salaar Box Office Collection : प्रभासच्या 'सालार'ने बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; रिलीजच्या 10 दिवसांत केली 500 कोटींपेक्षा अधिक कमाई