मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा भाऊ अक्षतचा लग्नसोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. रनौत कुटुंबियांनी दिवाळीच्या निमित्ताने नववधूचं आपल्या घरी जल्लोषात स्वागत केलं.आता कंगनाने भावाच्या लग्नसोहळ्यातील समारंभाचे नवीन फोटो शेअर केले आहेत. लग्नानंतर ठेवण्यात आलेल्या रिसेप्शनला धाम असं म्हटलं जातं. कंगनाने या सोहळ्यासाठी एक सिंपल साडी आणि पहाडी टोपी आणि शाल घेतली होती. यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. कंगनाने रिसेप्शनमध्ये पहाडी गाण्यांवर डान्स केला आहे. याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.


कंगना रनौतने या व्हिडीओमध्ये आपली वहिनी आणि आईसोबत एका पहाडी गाण्यावर डान्स केला आहे. एक मिनिट 28 सेकंदांच्या हा व्हिडीओ शेअर करताना कंगना रनौतने लिहिलं आहे की, "मला प्रत्येक परंपरेतील लोकसंगीत फार आवडतं, माझ्या भावाच्या रिसेप्शनमध्ये पहाडी कलाकार कांगडी गाणं गात आहेत. याचा अर्थ साधारण आहे, एक महिला आपल्या आईसाठी आपलं प्रेम व्यक्त करत आहे."





कंगनाचा हा व्हिडीओ ट्विटरवर 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. कंगनाच्या या व्हिडीओ ट्वीटवर तिचे चाहते आणि फॉलोअर्स कंगनाच्या भावाला लग्ननिमित्त शुभेच्छा देत आहेत. याव्यतिरिक्त कंगनाने काही फोटोही शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंमध्ये ती फार सुंदर दिसत आहे. यापैकी एका फोटोमध्ये ती आपला भाऊ आणि तिची वहिणी ऋतूसोबत दिसत आहे.





हे फोटो शेअर करताना कंगना रनौतने लिहिलं आहे की, 'आज अक्षत आणि ऋतू यांच्या लग्नाच्या धाम (रिसेप्शन) साठी पारंपारिक पहाडी आउटफिट वेअर केलं आहे.' कंगनाने या फोटोंमध्ये एक पहाडी टोपी वेअर केली आहे. त्याचसोबत कंगनाने एक शालही घेतली आहे. तसेच तिने गळ्यात एक सुंदर नेकलेस वेअर केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :