Soumitra Chatterjee Passes Away : प्रसिद्ध अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन झालं असून ते 85 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ते कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात अॅडमिट होते. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. 5 ऑक्टोबर रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं.


सौमित्र चॅटर्जी यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं होतं. रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली होती. गेल्या 48 तासांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. रूग्णालयाने सौमित्र चॅटर्जी यांच्या प्रकृतीसंदर्भात काल एक बुलेटीन जारी केलं होतं. त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की, 'आम्ही सीटी स्कॅन केलं आहे, जेणेकरून हे माहिती होईल की, नक्की कोणती समस्या आहे. तसेच आम्ही एक ईईजीही केलं होतं. त्यामध्ये समजलं की, त्यांच्या न्युरॉलॉजिकल समस्येत वाढ झाली आहे. तसेच त्यांना ऑक्सिजन घेण्यास त्रास होत आहे.'


डॉक्टरांनी बुलेटीनमध्ये सांगितलं होतं की, पुढिल 24 तास डॉक्टर्स सौमित्र यांच्या प्रकृतीवर बारीक नजर ठेवणार आहेत. तसेच 'अद्याप त्यांची परिस्थिती नाजूक आहे. परंतु, देवाच्या कृपेने ते कदाचित या परिस्थितीतून बाहेर येऊ शकतात.' अशी आशाही डॉक्टरांनी व्यक्त केली होती.


कोण होते सौमित्र चॅटर्जी? 


सौमित्र चॅटर्जी हे बंगाली सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते होते. सौमित्र चॅटर्जी यांनी 1959 मध्ये चित्रपट 'अपुर संसार' मधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. सौमित्र चॅटर्जी यांनी ऑस्कर विनिंग दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्यासोबत 14 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. सौमित्र चॅटर्जी यांचा दमदार अभिनयामुळे ते अनेक दिग्दर्शकांचे फेवरेट अभिनेते होते.


सौमित्र चॅटर्जी हे पहिले भारतीय होते, ज्यांना कलाकारांना देण्यात येणाऱ्या फ्रान्सचा सर्वात मोठा पुरस्कार Ordre des Arts et des Lettres ने गौरवण्यात आलं होतं. तसेच दादा साहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. याव्यतिरिक्त संगीत नाटक अॅकॅडमी अवॉर्ड, 7 फिल्मफेअर अवॉर्ड्स सोबतच त्यांना पद्म भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.


महत्त्वाच्या बातम्या : 


‘लागिरं झालं जी’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं निधन