मुंबई : अभिनेत्री आणि मॉडेल दिव्या चौकसेचं निधन झालं असून ती कॅन्सरग्रस्त होती. दिव्या बऱ्याच दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत होती. अखेर तिची ही झुंज अपयशी ठरली आहे. यासंदर्भात दिव्याची मावस बहिण सौम्याने फेसबुकवर पोस्ट करत माहिती दिली. दिव्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये निधनापूर्वीच्या शेवटच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, ती मृत्यूच्या जवळ आहे. दिव्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोस्ट पाहून चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.



दिव्याच्या बहिणीने फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'मला हे सांगताना अत्यंत दुःख होत आहे की, माझी मावस बहिण दिव्या चौकसेचं कमी वयात कॅन्सरमुळे निधन झालं आहे. तिने लंडनमधून अॅक्टिंगचा कोर्स केला होता. ती एक उत्तम मॉडेल होती. तिने अनेक चित्रपटांमध्ये आणि टीव्ही शोजमध्ये काम केलं होतं. तिने अनेक गाणीही गायली आहेत. आज ती आपल्याला सोडून गेली. ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो.'



दिव्या चौकसेने इन्स्टाग्रामवर लिहिलं होतं की, 'शब्द ती गोष्ट सांगू शकत नाहीत जे मला सांगायचं आहे. माझ्याकडे बरेच दिवसांपासून सहानुभूति देणारे मेसेज येत आहेत. परंतु, वेळ अशी आहे की, मी तुम्हा लोकांना सांगू इच्छिते की, मी सध्या मृत्यूशय्येवर आहे. परंतु, मी खंबीर आहे. कदाचित अजिबात दुःख नसलेलं आणखी एक आयुष्य असतं. सध्या कोणताच प्रश्न नाही. फक्त देवच जाणतो की, तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहात.'



दरम्यान, दिव्या सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह नव्हती. परंतु, तिने तिच्या शेवटच्या ट्वीटमध्ये मदत मागितली होती. दिव्याने आपल्या शेवटच्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, 'कोणाला misseltow थेरपीबाबत माहिती आहे का? मला मदतीची गरज आहे.' चित्रपट 'है अपना दिल तो आवारा' मधून दिव्याने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली होती. दिव्या अनेक टीव्ही शो आणि जाहीरातींमध्येही दिसून आली होती.


महत्त्वाच्या बातम्या : 


Amitabh Bachchan | अभिनेता अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण; नानावटी रुग्णालयात भरती


अमिताभ बच्चन यांच्यानंतर मुलगा अभिषेक बच्चन याचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह


ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या यांनाही कोरोनाची लागण