मुंबई : बॉलिवूड चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांना शहरातील नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अमिताभ यांनी स्वतः ट्विट करुन याबद्दल माहिती दिली आहे. अमिताभ यांची काल (11 जुलै) कोरोना चाचणी केली होती. ज्याचा अहवाल आज आला आहे.


अमिताभ यांचे ट्विट -
माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घरातील सदस्यांच्याही कोरोना चाचणी करण्यात आल्या असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. मागील 10 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी, अशी विनंतीही बच्चन यांनी केली आहे.

T 3590 -I have tested CoviD positive .. shifted to Hospital .. hospital informing authorities .. family and staff undergone tests , results awaited ..
All that have been in close proximity to me in the last 10 days are requested to please get themselves tested !

अमिताभ यांना सौम्य लक्षणं

एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. यांनी सुरुवातीला सौम्य लक्षणं दिसताच त्यांनी कोरोना टेस्ट करुन घेतली. त्यांच्या आणखी चाचण्या करण्यात येत असल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं आहे.

कुटुंब आणि स्टाफ क्वॉरंटाईन
अमिताभ बच्चन यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सोबतच त्यांच्या घरातील स्टाफचा कोरोना चाचणी करण्यात आलीय. सर्वांनी स्वतःला क्वॉरंटाईन करुन घेतले आहे. कुटुंबातील सदस्य आणि स्टाफचा रिपोर्ट येणे बाकी आहे.

अमिताभ बच्चन लवकरचं रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा चित्रपट 'ब्रह्मास्त्र' मध्ये दिसणार आहे. याअगोदर बिग बी अखेरीस गुलाबो-सिताबो या चित्रपटात पाहायला मिळाले होते. या चित्रपटात आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. गुलाबो-सिताबो ओटीटी प्लेटफॉर्म रिलीज झाला होता. अमिताभ बच्चन सध्या त्यांचा प्रसिद्ध टिव्ही शो 'कौन बनेगा करोडपती' च्या 12 भागाची तयारी करत होते.

Amitabh Bachchan Corona positive | कोरोना झाल्याने महानायक अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयात दाखल