OTT Release This Week : ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT) दर आठवड्यात अनेक धमाकेदार चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) रिलीज होत असतात. मे महिन्याचा शेवटचा आठवडाही प्रेक्षकांसाठी खूप खास असणार आहे. या आठवड्यात अनेक बहुप्रतिक्षीत वेबसीरिज आणि चित्रपट रिलीज होणार आहेत. 28 मे 2024 रोजी ओटीटीवर रिलीज होणारे चित्रपट आणि वेहसीरिज पाहण्यासाठी तुम्हाला 24 तासदेखील अपुरे पडतील. नेटफ्लिक्स (Netflix), प्राईम व्हिडीओ (Prime Video) आणि झी 5 (Zee 5) सह वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि सीरिज रिलीज होणार आहेत. कॉमेडी, अॅक्शन अशा वेगवेगळ्या जॉनरचा कंटेट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 


पंचायत 3 (Panchayat 3)
कधी रिलीज होणार? 28 मे 2024
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ


'पंचायत'च्या तिसऱ्या सीझनची चाहत्यांना उत्सुकता आहे. अखेर अवघ्या काही तासांत चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. फुलेरा गावाची गोष्ट, सरपंच, सचिव आणि बनराकस पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. यावेळी मंजू देवी निवडणूक लढवताना दिसेल. ही सीरिज प्रेक्षकांना प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.


स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantrya Veer Savarkar)
कधी रिलीज होणार? 28 मे 2024
कुठे पाहता येईल? झी 5


रणदीप हुड्डाचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट सिनेमागृहानंतर आता ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने खूप मेहनत घेतली आहे. 28 मे 2024 रोजी हा चित्रपट झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.


इल्लीगल 3 (Illegal 3)
कधी रिलीज होणार? 29 मे 2024
कुठे पाहता येईल? जिओ सिनेमा


'इल्लीगल 3' या सीरिजचा 29 मे 2024 रोजी जिओ सिनेमावर प्रीमियर होणार आहे. या सीरिजमध्ये नेहा शर्मा, पीयूष मिश्रा, अक्षय ओबेरॉय, नील भूपालम आणि सत्यदीप मिश्रासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 29 मे 2024 रोजी जिओ सिनेमावर या सीरिजचा प्रीमिअर होणार आहे. कायद्यातील डावपेच आणि रोजच्या आयुष्यात ऐकावे लागणाऱ्या टोमण्यांवर आधारित आहे. पहिले दोन सीझन हिट झाले आहेत. आता तिसऱ्या सीझनची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.


एटलस (Atlas) 
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स


हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेजचा अमेरिकन सायंस फिक्शन अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'एटलस' नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. ब्रेड पेटनने या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सिमू लियू, स्टर्लिंग के. ब्राउन, ग्रेगरी जेम्स कोहन, अब्राहम पॉपुला, लाना पैरिला आणि मार्क स्ट्रॉन्ग महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


रत्नम (Ratnam)
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ


तामिळ स्टार विशालचा 'रत्नम' हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर रिलीज होत आहे. या अॅक्शन, थ्रिलर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा हरि ने सांभाळली आहे. प्रिया भवानी शंकर, समुथिरकानी, गौतम वासुदेव मेनन, योगी बाबू, मुरली शर्मा, हरीश पेराडी, मोहन रमन आणि विजयकुमार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


डाय हार्ट 2 
कधी रिलीज होणार? 30 मे 2024
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ


'डाय हार्ट 2' हा कॉमेडी अॅक्शन चित्रपट आहे. केविन हार्ट, नताली एम्युनल आणि जॉन सीना सारखे कलाकार या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 30 मे 2024 रोजी प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल.


द गोट लाइफ


कुठे रिलीज होणार? हॉटस्टार
कधी रिलीज होणार? 26 मे 2024


'द गोट लाइफ' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. 26 मे 2024 रोजी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होईल.


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan : 'KKR'चा विजय, शाहरुखचा आनंद गगनात मावेना! कोलकाता टीम जिंकताच गौरी खानला केलं KISS; सुहानालाही अश्रू अनावर