मुंबई : संजूबाबा... संजूबाबा आठवला की, आठवते ती तब्येत. मस्त धिप्पाड देह आणि मजबूत खांदे. बलदंड बाहू असले तरी थोडा झुकून तो तब्येतीत चालायचा. त्याच्या चालीचीही स्टाईल झाली होती तरुणाईत. रॉकी, खलनायक, साजन, सडक, मुन्नाभाई एमबीबीएस, एकलव्य, परिणीता आदी अनेक सिनेमांतून तो दिसला. पुढे त्याला तुरूंगवास भोगायला लागला वगैरेचा इतिहास आपल्याला माहीत आहेच. पण त्यातही त्याची तब्येत सांभाळून होता तो. पुढे तुरुंगातून आल्यानंतर त्याने अनेक सिनेमे केले. दुर्दैवाने काही दिवसांपूर्वी त्याला कर्करोगाचं निदान झालं. ही गोष्टही केवळ दोन महिन्यांतली. आता संजूबाबा अमेरिकेत उपचार घेतोय. त्याच्या तब्येतीचे फोटो सध्या व्हायरल होतायत.



संजूबाबाचा व्हायरल फोटो 

अमेरिकेत संजूबाबा उपचार घेतो आहे. त्याला फुप्फुसाचा कर्करोग झाला आहे. त्याला सुरुवातीला श्वसनाचा त्रास सुरु झाला. म्हणून त्याची कोविड चाचणी केली गेली. पण ती निगेटिव्ह आली. त्यानंतर केलेल्या निदानातून त्याला कर्करोग झाल्याचं निष्पन्न झालं. त्यावेळी त्याचा सडक ऐन रिलीजवर होता. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर नेपोटिझमच्या मुद्दयाने उचल खाल्ली होती. त्यात सडक बॅन करायची चर्चा होती. महेश भट्ट, अलिया भट्ट, संजय दत्त ही सगळी स्टार पुत्रांची फॅमिली या सिनेमाशी बांधली गेल्याने हा राग होता. असं असताना हा सिनेमा ओटीटीवर यायला काही दिवस उरले असताना संजय दत्तला कर्करोगाचं निदान झालं. सुरुवातीला हा स्टंट आहे की, काय असंही बोललं गेलं. पण नंतर ही वार्ता खरी ठरली आहे.


संजय दत्तचा विषय आता येण्याचं कारण असं की, संजूबाबाचा अमेरिकेतला फोटो व्हायरल झाला आहे. यात तो एका आरोग्य कर्मचाऱ्यासमवेत आहे. त्यात तो उभा असून कॅमेऱ्याकडे पाहत आहे खरा. पण कर्करोगाच्या उपचारांनी त्याची तब्येत पुरती हादरली आहे. संजूबाबा असा इतका बारीक दिसेल याचा विचारही कुणी केला नव्हता. त्याचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सच्या याच प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. संजय दत्त यात अत्यंतिक बारीक वाटत नसला तरी त्याची तब्येत कमालीची बारीक झाली आहे. त्याचे हात, खांदे.. आणि एकूणच तब्येतीवर हा परिणाम झाला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :