Happy Birthday Kunal Khemu : बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक अभिनेत्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयक्षेत्रातील करिअरची सुरुवात केली आहे. पण मोठेपणी ते या क्षेत्रात करिअर करतील आणि यशस्वी होतील असं होत नाही. पण अभिनेता कुणाल खेमू (Kunal Khemu) बालकलाकार म्हणून चांगलाच लोकप्रिय होता आणि आजही तो एक कमाल अभिनेता आहे. अभिनेता असण्यासोबत कुणाल खेमू दिग्दर्शक म्हणूनही लोकप्रिय आहे. 


कुणाल खेमूने आपल्या करिअरची सुरुवात वयाच्या चौथ्या वर्षी केली आहे. बालपणी कुणालने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं आहे. कुणाल 24 मे 2024 रोजी आपला 41 वा वाढदिवस साजरा करणार आहे. 


कुणाल खेमूचा जन्म 25 मे 1983 मध्ये श्रीनगरमधील काश्मीरी पंडितांच्या घरी झाला आहे. कुणालच्या वडिलांचं नाव रवी खेमू आणि आईचं नाव ज्योती खेमू आहे. कुणालच्या छोट्या बहिणीचं नाव करिश्मा खेमू आहे. श्रीनगरमध्ये कुणालचं शालेय शिक्षण झालं आहे. पुढे मुंबई विद्यापीठातून कॉमर्समध्ये त्याने पुढील शिक्षण घेतलं. कुणाल खेमू आणि सोहा अली खानने 2015 मध्ये लग्न केलं. 2009 पासून ते रिलेशनशीपमध्ये होते. सोहा अली खान कुणाल खेमूपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे. कुणाल-सोहाला 2017 मध्ये एक मुलगी झाली. इनाया नॉमी खेमू असं या मुलीचं नाव आहे.


कुणाल खेमूचा 'असा' आहे प्रवास


कुणाल खेमूने वयाच्या चौथ्या वर्षी 'गुल गुलशन गुल्फाम' या दूरदर्शनच्या मालिकेच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. 1993 मध्ये वयाच्या 10 व्या वर्षी कुणालने महेश भट्टच्या 'सर' या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पुढे 'राजा हिंदुस्तानी','जख्म','भाई','हम हैं राही प्यार के' आणि 'दुश्मन' सारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं. बालपणी कुणाल खेमूच्या कामाचं खूप कौतुक झालं. त्यामुळे एका कामातून दुसरं काम त्याला मिळत गेलं.


कुणाल खेमूचे चित्रपट (Kunal Khemu Movies)


कुणाल खेमूने 1999 नंतर काही वर्षांचा ब्रेक घेतला. त्यानंतर 2005 मध्ये कलयुग या एडल्ट चित्रपटात तो पहिल्यांदा झळकला. मोहित सूरीचा हा चित्रपट होता. या चित्रपटातील गाणीदेखील सुपरहिट ठरली. त्यानंतर कुणाल खेमूने 'ट्रॅफिक सिग्नल','ढोल','गोलमाल 3','ब्लड मनी','गो गोआ गॉन','लूटकेस','मलंग','गोलमाल अगेन' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. पुढे 'मडगांव एक्सप्रेस' या चित्रपटाच्या माध्यमातून कुणाल खेमूने दिग्दर्शन क्षेत्रात करिअर करायला सुरुवात केली.


संबंधित बातम्या


Ashok Saraf Rohini Hattangadi : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार