Ashok Saraf Rohini Hattangadi : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 14 जून 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्य संकुलात अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नाट्यरसिकांमध्ये या सोहळ्याची चांगलीच उत्सुकता आहे. 


नाट्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रंगकर्मीचा नाट्य परिषदेच्या वतीने सत्कार केला जातो. त्यानिमित्ताने यंदा कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 100 वं नाट्य संमेलन नुकतचं पार पडलं. या नाट्य संमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेला 'नाट्य कलेचा जागर' यातील सर्वोत्कृष्ट पारितोषिकप्राप्त एकांकिका, बालनाट्य, एकपात्री, नाट्यछटा, नाट्य संगीत पद गायन, नाट्य अभिवाचन कार्यक्रम यानिमित्ताने सादर होणार आहेत. कै. शाहीर साबळे, कै. सुधीर भट, कै. स्मिता तळवळकर आणि कै. आनंद अभ्यंकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाट्य परिषदेतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने रंगभूमीसाठी देण्यात येणारे पुरस्कार कसे आहेत? 


- लीला मेहता पुरस्कृत भार्गवराम पांगे कार्यकर्ता पुरस्कार : गणेश तळेकर (नाट्य चळवळीसाठी विनामूल्य कार्याबद्दल)


- डॉ. न. अ. बरवे स्मृती पुरस्कार - प्रशांत जोशी


- कमलाकर वैशंपायन स्मृती पुरस्कार - दीपाली घोंगे


- कै. भालचंद्र त्र्यंबक जोशी स्मृती पुरस्कार - शशांक लिमये (उत्कृष्ट निवेदक)


- बाळकृष्ण भोसले स्मृती पुरस्कार - विजय जगपात (गुणी रंगमंच कामगार)


- वि.स. खांडेकर नाट्यसमीक्षा पुरस्कार - संजय देवधर (समीक्षा)


- अ. सी. केळुस्कर स्मृती पुरस्कार - गोविंद गोडबोले (बालरंगभूमीवरील योगदान)


- कै. विनय आपटे, कै. अविनाश फणसेकर आणि कै. भाई बोरकर स्मृती पुरस्कार - प्रायोगिक नाट्यसंस्था- अभिनय संस्था (कल्याण) - अभिजीत झुंझारराव


सर्वोत्कृष्ट नाट्य व्यवस्थापक - प्रणीत बोडके


- नाट्य मंदार पुरस्कार - अशोक ढेरे


- उत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार - अशोक बेंडखळे


- कामगार रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार - श्याम आस्करकर


- विशेष पुरस्कार - स्व: रितेश सांळुके (कार्यकर्ता पुरस्कार) 


सुनील बेंडखळे यांना लोककलावंत पुरस्कार


सुनील बेंडखळे यांना अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा लोककलावंत पुरस्कार जाहीर झाला आहे. 'कोकणचा साज संगमेश्वरी बाज' या लोकप्रिय लोकनाट्याचे ते सूत्रधार आहेत. आतापर्यंत या लोकनाट्याचे त्याने 450 प्रयोग सादर केले आहेत. पुरस्कार जाहीर झालेल्या सर्वच कलाकारांचं विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. 14 जून 2024 रोजी कलाकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.


संबंधित बातम्या


Ashok Saraf : असामान्य कलाकाराच्या नावाने अन् असामान्य नटाच्या समोर हा पुरस्कार मिळणं..., मंगेशकर पुरस्कारानंतर अशोक सराफांनी व्यक्त केल्या भावना