Allu Arjun Pushpa 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2) हा या वर्षीतील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाबाबत सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. 'पुष्पा...पुष्पा...पुष्पाराज'चा चांगलाच बोलबाला आहे. चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यात अल्लू अर्जुनने धुमाकूळ घातला आहे. आता चाहत्यांना श्रीवल्ली उर्फ रश्मिका मंदाना आणि पुष्पाराजच्या (अल्लू अर्जुन) दुसऱ्या गाण्याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. 'पुष्पा 2'मधील दुसरं गाणं 29 मे 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी 'पुष्पा 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'पुष्पा 2' या चित्रपटाचा एडिटर एंटनी रुबेनने रिलीजच्या आधीच हा प्रोजेक्ट सोडला आहे. बिजी शेड्यूलमुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. एडिटरने चित्रपट सोडला असला तरी हा चित्रपट ठरलेल्या दिवशीच रिलीज होणार आहे. अशातच आता या चित्रपटात एक मोठी एन्ट्री झाली आहे. चित्रपट रिलीज व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 'पुष्पा 2' या चित्रपटातही 'पुष्पा'प्रमाणे एक आयटम सॉन्ग असणार आहे. पण यावेळी समंथा रुथ प्रभू नसेल. सुरुवातीपासूनच या चित्रपटात दिशा पाटनीचं स्पेशल सॉन्ग असणार असं म्हटलं गेलं आहे.


अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'मध्ये 'भाभी 2'ची एन्ट्री!


तेलुगू 360 डॉट कॉमच्या एका रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या रिलीजआधीपासूनच दिग्दर्शक सुकुमार मोठा प्लॅन करत आहेत. चित्रपटातील आयटम नंबरवर प्लॅनिंग सुरू आहे. या आयटम नंबरसाठी अनेक अभिनेत्रींना विचारणा होत आहे. अशातच आता निर्मात्यांनी 'अॅनिमल'मधील (Animal) भाभी 2 उर्फ तृप्ति डिमरीला आयटम नंबरसाठी लॉक केलं आहे.


'पुष्पा 2'मधील आयटम सॉन्गचं जून महिन्यात शूटिंग होणार आहे. या गाण्याच्या शूटिंगसाठी एक खास सेट तयार करण्यात आला आहे. आयटम सॉन्गवर विशेष तयारी करण्यात येत आहे. आयटम सॉन्गसाठी दिशा पटानी नव्हे तर तृप्ती डिमरीच्या नाव फायनल करण्यात आलं आहे. तर देवी श्री प्रसाद यांनी आयटम नंबरसाठी एक शानदार गाणंदेखील तयार केलं आहे. 


तृप्ति डिमरीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... (Tripti Dimri Upcoming Project)


'अॅनिमल'मधील 'भाभी 2' हे पात्र चांगलच गाजलं. या भूमिकेच्या माध्यमातून तृप्ति डिमरी रातोरात नॅशनल क्रश झाली. हा चित्रपट तिच्या करिअरमधला टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर अनेक चित्रपटांसाठी तिला विचारणा झाली. तृप्ती सध्या कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. त्यानंतर ती एका रोमँटिक चित्रपटात झळकणार आहे. राजकुमार राव आणि विकी कौशलच्या आगामी चित्रपटातही ती दिसणार आहे.


संबंधित बातम्या


मोठी बातमी! आजपासून दहा दिवस सिनेमागृह बंद; लोकसभा निवडणुक आणि 'IPL'चा फटका